-
नोरा फातेही या अभिनेत्रीने स्त्रीस्वातंत्र्याबद्दल अनुदार भूमिका घेत दिलेल्या मुलाखतीच्या निमित्ताने आज लोकसत्तामध्ये गायत्री लेले यांचा ‘ ट्रॅड वाइफचा आभासी ट्रेंड ?’ हा लेख प्रसिद्ध झाला आहे. त्याच सोबतीला एकोणीसाव्या शतकाच्या अखेरीस (या काळाचे महत्त्व वेचताना...: स्वातंत्र्य आले घरा या लेखामध्ये अधोरेखित केले आहे.) अमेरिकेमध्ये सुरु झालेल्या स्त्री-स्वातंत्र्य नि स्त्री-हक्क यांच्या चळवळीबाबत एका पौगंडावस्थेतील मुलाने केलेले हे टिपण, मॅन्युअल कॉमरॉफ यांच्या ‘बिग सिटी, लिट्ल बॉय’ या स्मरण-नोंदींमधून (memoirs). पुरुषी अहंकार, नव्या कल्पनांची टवाळी, अधिक्षेप, त्याकडे मनोरंजन म्हणून पाहाणे वगैरे टप्पे पाहता भारतीय समाजालाही ही निरीक्षणे बरीचशी चपखल बसतील. --- चित्रपटाप्रमाणेच आणखीही एक … पुढे वाचा »
RamataramMarquee
रमतारामाच्या विश्रांतीस्थळी:   
वारसा, जिज्ञासा आणि ज्ञान - १. वृद्धत्वाची जेथ प्रचिती... काव्य-मोतीचूर ऊर्फ काही ‘चविष्ट’ प्रेमकविता       चला दोस्तहो, खाण्यावरती बोलू काही       मूषकान्योक्ती       सुजन गवसला जो       क्रिकेटमधील उपेक्षितास दाद       बाबेलचा दुसरा मनोरा       Will He...?       To Dumbo, with Love       पहलगाम आणि आपण      
शनिवार, २७ एप्रिल, २०२४
न स्त्री स्वातंत्र्यमर्हती
Labels:
कादंबरी,
पुस्तक,
मंतरलेले बेट,
मॅन्युअल कॉमरॉफ,
व्यंकटेश माडगूळकर
रविवार, २१ एप्रिल, २०२४
धारयते इति धर्मः ?
-
दवबिंदूच्या एवढ्याशा आयुष्यात कोवळ्या सूर्यकिरणांचं इंद्रधनुष्य चमकून जावं, नदी उगम पावावी, डोंगरांनी ताठ मानेनं संसार थाटावेत, उत्तम जुळवलेले तंबोरे छेडले जात असताना त्यांतून फुलणाऱ्या गाण्यासारखी, समुद्राच्या गाजेच्या सुरावर किनाऱ्यावर येणा-जाणाऱ्या लाटांच्या फेसाच्या रंगीबेरंगी फुलांची पखरण होत राहावी, अशा असंख्य निर्मितीशी कसलाही संबंध नसताना, हे सारं वैभव वेळोवेळी भोगण्याचे योग माझ्या आयुष्यात अनेकदा येत राहिले आणि ‘अनंत हस्ते कमलावराने, देता किती घेशिल दो कराने’ अशी संधी माझ्या आयुष्यात वरचेवर मिळतच राहिली. पण त्याचबरोबर त्याबद्दलची आपली कृतज्ञता दुबळी असल्याच्या जाणिवेनं, आनंदाश्रूतच दुःखाश्रूही अधूनमधून मिसळत राहिले. आपण लहान बाळाचा मुका घेतो, कुणावर तरी प्रेम करतो, ते आपल्या आनंदात भर घालण्यासाठी! ही नैसर्गिक श्रीमंती वाढवत आणि … पुढे वाचा »
शुक्रवार, १२ एप्रिल, २०२४
स्वातंत्र्य आले घरा (उत्तरार्ध)
-
<< पूर्वार्ध शिलरकडे जाऊन त्यांचे काम बघत बसणे मला फार आवडे. त्यांच्या दुकानाला येणारा कातड्याचा, खळीचा वास आवडे. दुकानातले शेल्फ लाकडी साच्यांनी भरलेले असत. प्रत्येक साच्याला गिऱ्हाइकाच्या नावाची चिठ्ठी दोऱ्याने बांधलेली असे. खिळे, हातोडे, पावलांच्या आकृत्यांनी भरलेली खतावणी-बुके, हे सगळे मला आवडे. स्वतः शिलर आवडत. तासन् तास त्यांचे कसब बघत मी बसून राही. ते म्हणत, “मी चांभार नाही. बूट तयार करणारा कारागीर आहे.” त्यांचे शिक्षण युरोपमध्ये झाले होते. आपल्या धंद्याचा त्यांना फार अभिमान होता. पण काळानुसार त्यांचा धंदा खालावला होता; आता पुष्कळसे काम येई ते दुरुस्तीचेच. शिलरना त्यात कमीपणा वाटे; पण जे थोडेफार चांगले काम मिळे त्यात ते आनंद मानत. कधी-कधी बेढब पायाचा माणूस तळघराच्या पायऱ्या… पुढे वाचा »
Labels:
कादंबरी,
पुस्तक,
मंतरलेले बेट,
मॅन्युअल कॉमरॉफ,
व्यंकटेश माडगूळकर
रविवार, ७ एप्रिल, २०२४
स्वातंत्र्य आले घरा (पूर्वार्ध)
-
नव्या शतकाच्या सुरुवातीला कामगार वर्गातील जागृती आम्ही पाहिली. या काळात माणूस, यंत्र आणि संपत्ती यांच्या परस्परांशी असलेल्या नात्याची जाणीव आम्हाला होऊ लागली, सत्य परिस्थिती समजू लागली; समजलेले सत्य कडू होते. आम्हाला माहीत असलेले शांत जीवन या सत्यामुळे उधसले. त्याने आम्हाला अस्वस्थ केले. वर्तमानपत्रात त्रासदायक घटनेची बातमी नाही, असा आठवडा जाईना. पिट्सबर्गला संपाचा प्रयत्न, कापडाच्या गिरणीत लहान मुले राबविल्याबद्दल निषेध, कोळशाच्या खाणीतील मजूरवर्गात आणि त्यांच्या कुटुंबांत पसरलेल्या क्षयरोगाबाबतचा वृत्तांत, असले लेख नियमाने प्रसिद्ध होत आणि सगळे वातावरणच दूषित झाले आहे, असे वाटे. ‘कामगार’, ‘भांडवल’, ‘औद्योगिक क्रांती’, ‘संप’, 'रोजगार' असले शब्द जिथे-तिथे कानी पडू लागले. आमच्या दुका… पुढे वाचा »
Labels:
कादंबरी,
पुस्तक,
मंतरलेले बेट,
मॅन्युअल कॉमरॉफ,
व्यंकटेश माडगूळकर
गुरुवार, ४ एप्रिल, २०२४
वेचताना... : स्वातंत्र्य आले घरा
-
मध्यंतरी व्यंकटेश माडगूळकरांचे ‘माणदेशी माणसे’ ( पुन्हा एकदा ढापले गेल्याने ) ऑर्डर करण्यासाठी ‘बुकगंगा’वर गेलो. तिथे ‘या सोबत घ्या’ म्हणून ‘मंतरलेले बेट’ नावाचे एक पुस्तक सुचवले होते. शीर्षकावरून हे बालवाङ्मयाचा भाग असावे असे वाटले. तिथे काही पाने अवलोकनार्थ ठेवलेली असतात. ती चाळता एका मुलाचे आत्मकथन आहे असे ध्यानात आले. तेव्हा आपला तर्क खरा ठरला असे वाटले. तरीही तेव्हा काही हलके-फुलके वाचण्यासाठी हवेच होते म्हणून त्याची मागणीही नोंदवली होती. एकदा डोक्याला फार ताण देणारे वाचून झाल्यावर हलके फुलके म्हणून हाती घेतले. मुखपृष्ठावरून समजले की हा Manuel Komroff नावाच्या कुण्या अमेरिकन लेखकाच्या ‘Big City Little Boy’ या पुस्तकाचा अनुवाद आहे. त्याचे वर्गीकरण ‘कादंबरी’ असे दिलेले असले तरी ( पुढे २००… पुढे वाचा »
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)