-
माणूस हा प्राणिकुलातील एकमेव विचारशील प्राणी आहे असे म्हटले जाते... पण ते केवळ मानवी अहंकाराने लिप्त असलेले विधान आहे असे माझे मत आहे! अन्य प्राण्यांचा विचार माणसांच्या विचारवाटेवर जात नसल्याने, माणसाला जाणवत नाही इतकेच. म्हणजे कदाचित हे विधान मानवी अज्ञानाचे निदर्शकही असू शकेल. पण एक गोष्ट आहे जी निर्विवादपणे मानवजातीची निर्मिती आहे, आणि ती म्हणजे विनोद! अगदी ’परिहासविजल्पिता’पासून ’अति झालं नि हसू आलं’ पर्यंत विनोदाच्या अनेक छटा माणसाच्या आयुष्यात सापडतात. चिंपांझीमध्ये माणसाच्या बुद्धिमत्तेचे अनेक पैलू दिसतात. (अन्य काही मर्कटकुलातही!). पण त्यांच्यातही एक चिंपांझी काही हातवारे करुन दुसर्याला काही सांगतो आहे, आणि ते ऐकून दुसर्याची हसून हसून पुरेवाट झाली आहे असे दिसत नाही. त्यांच्या काही कृती या माफक परपीडेतून मनोरंजन करण्यापर्यंत पो… पुढे वाचा »
RamataramMarquee
रमतारामाच्या विश्रांतीस्थळी:   
वारसा, जिज्ञासा आणि ज्ञान - १. वृद्धत्वाची जेथ प्रचिती... काव्य-मोतीचूर ऊर्फ काही ‘चविष्ट’ प्रेमकविता       चला दोस्तहो, खाण्यावरती बोलू काही       मूषकान्योक्ती       सुजन गवसला जो       क्रिकेटमधील उपेक्षितास दाद       बाबेलचा दुसरा मनोरा       Will He...?       To Dumbo, with Love       पहलगाम आणि आपण      
शनिवार, ३० जानेवारी, २०२१
क्रियेविण वाचाळता सार्थ आहे
Labels:
चित्रपट,
दृक्-श्राव्य,
मालिका,
माहितीपट,
वेचित
रविवार, १७ जानेवारी, २०२१
वेचताना... : आर्त
-
जगभरातील संस्कृतींमध्ये कितीही वैविध्य असले, तरी त्यात पुरुषप्रधानता हा समान दोष आहे. तांत्रिकदृष्ट्या प्रगत आणि निसर्गापासून दुरावत गेलेल्या, तथाकथित प्रगत समाजांमध्ये ती अधिकच घट्ट झालेली दिसते. स्त्रीने जन्मत: बापाचे कुलनाम स्वीकारायचे आणि लग्नानंतर पतीचे हा प्रघात खूप प्राचीन आहे. अमेरिकेसारख्या तरुण आणि सर्वथा प्रगत राष्ट्रातही निदान जोडनाव लावण्याची पद्धत रूढ आहे. हा पुरुषी वर्चस्वाचा संस्कार घरातील मुलांनाही वारशाने मिळावा, हे ओघाने आलेच. त्यातच घरच्या पुरुषाचे असलेले स्थान वारशाने मिळवण्याची पुढच्या पिढीची धडपड, घरच्या स्त्रीला अर्थातच मागे सारून घरच्या पुरुषाशी नाळ जोडू पाहात असते. ’मूल आईचे की बापाचे?’ या प्रश्नाला ’फळ बीजाचे की क्षेत्राचे?’ या पर्यायी प्रश्नाशी समानार्थी मानत मूळ प्रश्नाचे निर्णायक उत्तर या समाजव्यवस्थांनी देऊ… पुढे वाचा »
शुक्रवार, १५ जानेवारी, २०२१
प्रत्यय
-
शर्माजींचा तबला घुमू लागला. बाईंनी हात करून थांबवलं त्यांना. वाद्याला नमस्कार डोळे मिटले. पूर्णमदः पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते | पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते || आसावरीची आलापी सुरू झाली. समेवर येतानाची कोमल रिषभावरची डोळे पाणावतील अशी सत्यजितची आर्त मिंड... सरोद घेतलेल्या बाईचं रूपही एखाद्या पवित्र नदीच्या सात्त्विक प्रवाहासारखे भासणारं... सत्यजित रंगात आला. आसावरीत तो शिरल्यावर बाई अवचितपणे थांबल्या. सत्यजितची रुंद लांब बोटं... नागाने सण्णकन काढलेल्या फण्यासारखा त्याचा टण्णकार. शेवटच्या लयीची बढ़त... तो घामाघूम होऊन थांबला. समाधानाने बाईंकडे पाहिलं. बाईंनी डोळे मिटलेले... स्तब्धच त्या. 'अम्मा... " सत्यजितच्या आवाजात अधीरता. बाईनी डोळे उघडले. म्हणाल्या, "आज म… पुढे वाचा »
Labels:
आर्त,
कथा,
पुस्तक,
मोनिका गजेंद्रगडकर,
वेचित
सोमवार, ११ जानेवारी, २०२१
किनारा तुम्हां पामरांना
-
शाळेत असताना कुसुमाग्रजांची ’ कोलंबसाचे गर्वगीत ’ ही कविता अभ्यासाला होती. पायाखालची स्थिर जमीन सोडून उधाणत्या दर्याचे आव्हान स्वीकारत त्याच्याशी झुंज घेणारा दर्यावर्दी आणि त्याचे सहकारी यांच्या प्रवृत्तीचे शब्दचित्र तिने उभे केले होते. ’कोट्यवधि जगतात जिवाणू, जगती अन् मरती जशी ती गवताची पाती नाविक आम्ही परंतु फिरतो सात नभांखाली निर्मितो नव क्षितिजे पुढती' असे म्हणताना एक बोट सागराकडे करत ’किनारा तुला पामराला’ म्हणत त्याच्या छातीवर बेगुमानपणे चढाई करणार्या, त्याला चिरडत जाणार्या त्या खलाशांचे ते चित्र शाळकरी वयात मनोहारी वाटावे असेच होते. याच जातकुळीचे एक गीत अलिकडेच मो’आना या डिस्ने स्टुडिओज निर्मित चलच्चित्रपटात पाहायला मिळाले. ’Away Away, we know the way' म्हणत समुद्राला … पुढे वाचा »
मंगळवार, ५ जानेवारी, २०२१
ट्रॉली प्रॉब्लेम, गेम, द गुड प्लेस आणि नैतिकतेचे प्रश्न
-
'याकूब मेमन'च्या फाशीच्या सुमारास 'फाशीची शिक्षा असावी का नसावी?' या तात्त्विक प्रश्नावर चर्चा चालू असताना 'ती नसावी' अशी बाजू मी मांडत होतो. पुढे पुरावे खोटे वा अपुरे होते, वकील आणि न्यायाधीश यांनी कदाचित त्यांची संगती योग्य तर्हेने लावली नव्हती, असे समोर आले तर घेतला जीव परत देता येत नसतो. व्यवस्थेने एखादा जीव हिरावून घेणे हा उलट फिरवता न येणारा निर्णय असतो. न्यायालयांच्या उतरंडीत वरच्या न्यायालयाने खालच्या न्यायालयाचा फिरवलेला निर्णय आपण अनेकदा पाहात असतो. त्यामुळे ही शक्यता नगण्य अजिबात नाही. पुरावे, माणसांची तसेच व्यवस्थांची निर्णयक्षमता, यांना मर्यादा असतात , त्यात पूर्वग्रहांचे हीण मिसळलेले असते आणि म्हणून या सार्यांमधे पुनरावलोकनाची, पुनर्विचाराची शक्यता शिल्लक ठेवावी लागते . तपशीलातले लहानसे बदलही प… पुढे वाचा »
Labels:
कथा,
दृक्-श्राव्य,
पुढल्या हाका,
पुस्तक,
मालिका,
वेचित,
सुबोध जावडेकर
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)