RamataramMarquee

सूची: अनुक्रमे  ▶ वेचे  ▶ वेचताना  ▶ दृक-श्राव्य  ▶
आर्त लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
आर्त लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, १७ जानेवारी, २०२१

वेचताना... : आर्त


  • जगभरातील संस्कृतींमध्ये कितीही वैविध्य असले, तरी त्यात पुरुषप्रधानता हा समान दोष आहे. तांत्रिकदृष्ट्या प्रगत आणि निसर्गापासून दुरावत गेलेल्या, तथाकथित प्रगत समाजांमध्ये ती अधिकच घट्ट झालेली दिसते. स्त्रीने जन्मत: बापाचे कुलनाम स्वीकारायचे आणि लग्नानंतर पतीचे हा प्रघात खूप प्राचीन आहे. अमेरिकेसारख्या तरुण आणि सर्वथा प्रगत राष्ट्रातही निदान जोडनाव लावण्याची पद्धत रूढ आहे. हा पुरुषी वर्चस्वाचा संस्कार घरातील मुलांनाही वारशाने मिळावा, हे ओघाने आलेच. त्यातच घरच्या पुरुषाचे असलेले स्थान वारशाने मिळवण्याची पुढच्या पिढीची धडपड, घरच्या स्त्रीला अर्थातच मागे सारून घरच्या पुरुषाशी नाळ जोडू पाहात असते. ’मूल आईचे की बापाचे?’ या प्रश्नाला ’फळ बीजाचे की क्षेत्राचे?’ या पर्यायी प्रश्नाशी समानार्थी मानत मूळ प्रश्नाचे निर्णायक उत्तर या समाजव्यवस्थांनी देऊन, तो प्रश्न आता रद्दबातल ठरवला आहे. श्री. ना. पेंडसेंच्या ’रथचक्र’मध्ये कर्तृत्वशून्य नवर्‍यामुळे मोठ्या कुटुंबात सदैव अवहेलना आणि दुय्यम स्थान सहन करत, अनेक पातळ्यांवरचा संघर्ष करत, लक्षुंबाई आपल्या दोनही मुलांच्या प्रगतीची वाट सुकर करत जाते. परंत...

    पुढे वाचा »

शुक्रवार, १५ जानेवारी, २०२१

प्रत्यय


  • शर्माजींचा तबला घुमू लागला. बाईंनी हात करून थांबवलं त्यांना. वाद्याला नमस्कार डोळे मिटले. पूर्णमदः पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते | पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते || आसावरीची आलापी सुरू झाली. समेवर येतानाची कोमल रिषभावरची डोळे पाणावतील अशी सत्यजितची आर्त मिंड... सरोद घेतलेल्या बाईचं रूपही एखाद्या पवित्र नदीच्या सात्त्विक प्रवाहासारखे भासणारं... सत्यजित रंगात आला. आसावरीत तो शिरल्यावर बाई अवचितपणे थांबल्या. सत्यजितची रुंद लांब बोटं... नागाने सण्णकन काढलेल्या फण्यासारखा त्याचा टण्णकार. शेवटच्या लयीची बढ़त... तो घामाघूम होऊन थांबला. समाधानाने बाईंकडे पाहिलं. बाईंनी डोळे मिटलेले... स्तब्धच त्या. 'अम्मा... " सत्यजितच्या आवाजात अधीरता. बाईनी डोळे उघडले. म्हणाल्या, "आज मी काही बोलणार नाही. तू तुझं परीक्षण करायचं." शर्माजीचा संथ ठेका चालू होता. धा धिं धिं धा... सत्यजित काही क्षण विचार करत राहिला. हळूहळू शर्माजीही थांबले. "नाही... " तो म्हणाला. "नाही जमला मला आसावरी." "कां असं वाटलं?...

    पुढे वाचा »