-
शर्माजींचा तबला घुमू लागला. बाईंनी हात करून थांबवलं त्यांना. वाद्याला नमस्कार डोळे मिटले. पूर्णमदः पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते | पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते || आसावरीची आलापी सुरू झाली. समेवर येतानाची कोमल रिषभावरची डोळे पाणावतील अशी सत्यजितची आर्त मिंड... सरोद घेतलेल्या बाईचं रूपही एखाद्या पवित्र नदीच्या सात्त्विक प्रवाहासारखे भासणारं... सत्यजित रंगात आला. आसावरीत तो शिरल्यावर बाई अवचितपणे थांबल्या. सत्यजितची रुंद लांब बोटं... नागाने सण्णकन काढलेल्या फण्यासारखा त्याचा टण्णकार. शेवटच्या लयीची बढ़त... तो घामाघूम होऊन थांबला. समाधानाने बाईंकडे पाहिलं. बाईंनी डोळे मिटलेले... स्तब्धच त्या. 'अम्मा... " सत्यजितच्या आवाजात अधीरता. बाईनी डोळे उघडले. म्हणाल्या, "आज मी काही बोलणार नाही. तू तुझं परीक्षण करायचं." शर्माजीचा संथ ठेका चालू होता. धा धिं धिं धा... सत्यजित काही क्षण विचार करत राहिला. हळूहळू शर्माजीही थांबले. "नाही... " तो म्हणाला. "नाही जमला मला आसावरी." "कां असं वाटलं?...
पुढे वाचा »
RamataramMarquee
नेकी कर और गटर में डाल ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - परिशिष्ट : ‘पदार्पण’ : एक कल्पनाविस्तार (उत्तरार्ध) ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - परिशिष्ट : ‘पदार्पण’ : एक कल्पनाविस्तार (पूर्वार्ध) ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - १५ : उपसंहार ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - १४ : अंत:स्फोटाची अपरिहार्यता ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - १३ : गरजा, मागणी आणि पुरवठा ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - १२ : जठराग्नी शमवाया भूतां ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - ११ : अद्यतनीकरण (Update)
मोनिका गजेंद्रगडकर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
मोनिका गजेंद्रगडकर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
शुक्रवार, १५ जानेवारी, २०२१
प्रत्यय
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
