RamataramMarquee

बुधवार, २८ जून, २०२३

None was worth my strife...

  • पाईप ओढायला लागलो त्याला आता वर्षाचा काळ लोटून गेला. जाणीवपूर्वक ही सवय मी स्वतःला जडवून घेतली आहे. मी एकांतप्रिय माणूस आहे. त्याहीपेक्षा दिवसभराची वर्दळ एकदा शांत झाल्यावर आरामखुर्चीत बसून पाईप ओढणे आताशा मला आवडू लागले आहे. या सवयीचा उगम माझ्या मनोवृत्तीतच आहे. कुठलेही मानसिक किंवा शारीरिक दडपण असह्य झाले की, प्रत्येक माणूसच मुक्तीचा मार्ग शोधीत असतो. माझे तसे नाही. मुक्ततेचा जो नाग मी कवटाळतो तोच मुळी माझ्या वृत्तीचे एक इंद्रिय म्हणून माझ्या जीवनात स्थायिक होऊन जातो. मग माणसे असोत की वस्तू! एखादा अनाथ मुलगा आपल्याकडे वार लावून जेवीत असावा, आणि अचानक आश्रित म्हणून आपल्याच घरी कायमचा राहून ज… Read more »

रविवार, १८ जून, २०२३

वाळूचा किल्ला

  • गोव्यातला 'कलंगुट' हा प्रसिद्ध सागरकिनारा. दिवस कलला होता. उन्हे सौम्य झालेली होती...समोर निळा सागर गर्जत होता आणि वाळूत रंगीबेरंगी माणसे हिंडत होती. सोबतीला कोणी नसल्यामुळे मला फार एकटे वाटत होते. गोव्यात डेप्युटेशनवर येऊन मला महिना झाला होता. मुलाबाळांची आठवण येत होती. ह्या सुरेख, निसर्गरम्य प्रदेशात आपण एकटे का आलो? उद्योग-धंद्याच्या निमित्ताने आपण एवढे भटकतो; पण सदैव एकटे, असे का बरे ?गर्दीतून बाजूची जागा बघितली आणि वाळूत पाय रोवून बसलो. दोन्ही हात वाळूत खुपसले. निळ्या-निळ्या पाण्यावर दृष्टी पसरली. उगाचच ओळी ओठांवर आल्या-'ने मजसी ने परत मायभूमीला
    सागरा, प्राण तळमळला. 'एवढ्… Read more »

सोमवार, १२ जून, २०२३

स्वातंत्र्य आणि गुलामगिरी

  • तो बाहेर पडून चालू लागला तेव्हा त्याला कोणीतरी हाक मारली व थांबवले. एका घराच्या कट्टयावरून एक माणूस उतरला व त्याच्याकडे आला. त्याने किंचित आश्चर्याने पाहिले व लगेच त्याला ओळख पटली. तो माणूस. मघाचा व्यापारी होता.“ मी तुझीच वाट पाहत थांबलो होतो, हे ऐकून तुला आश्चर्य वाटेल, नाही ?” व्यापारी म्हणाला. त्याच्या आवाजात रेशमी कापडाच्या घडीचा मृदुपणा होता. त्याच्या बरोबर चालू लागता त्याने हात मागे एकमेकात अडकवले व तो म्हणाला, “तूही एक प्रवासी आहेस, तू कोठेही जायला मोकळा आहेस, म्हणून मी तुझ्याशी बोलायला थांबलो होतो. जर तू पायमोकळा आहेस, तर तू एखादे काम स्वीकारशील ? त्यात तुम्हा भरपूर द्रव्य मिळेल, अनेक… Read more »