RamataramMarquee

सूची: अनुक्रमे ▶ वेचे ▶ वेचताना ▶ दृक-श्राव्य ▶
चर्चबेल लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
चर्चबेल लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, १९ जानेवारी, २०२४

चिमण्या - २ : दुरावा


  • या मालिकेच्या निमित्ताने... सहजीवन   << मागील भाग यावेळी मी इरेला पेटलो होतो. वेड लागले तरी बेहत्तर पण एकाही चिमणीला मी घरात येऊ देणार नव्हतो. वेड लागणार नाही तर आणखी काय होईल ? चिमण्यांवर पाळत ठेवण्याचे काम म्हणजे साधे प्रकरण नाही. आतापर्यंत मी त्यांच्याकडे कानाडोळा केला होता. कारण स्पष्ट आहे– त्यांच्यासंबंधीच्या मला बिलगून असलेल्या काव्यमय कल्पनांमुळे. परंतु या खेपेला त्यांनी आपला मोर्चा वळविला तो थेट माझ्या ऑईलपेन्टवाल्या फोटोकडेच. मुख्य म्हणजे हा माझा फोटो मला अती प्रिय आहे. क्षणाक्षणाला चिमणा-चिमणीचा जोडीने प्रवेश, सोबत प्रतिसाद देणाऱ्या चार-दोन सोबतिणी, शिवाय जिवाला पिसाळून टाकणारा त्यांचा चिवचिवाट तो वेगळाच ! गवताच्या काड्या, कापसाचे लहान-मोठे तंतू, कागदाचे कपटे आदींचा नाजुक प्रपंच त्यांनी माझ्या डोक्यावर थाटायला सुरुवात केली होती. आतापावेतो माझी पुस्तके, बाहुल्या, फ्लॉवरपॉट्स आदींचाच त्यांनी उपयोग केला होता. म्हणून त्यांचा उपद्रव मी लक्षातच घेतला नव्हता. पण आत्ताचा त्यांचा पवित्रा मला माझ्याविरुद्ध कट केल्याप्रमाणे वाटत होता! ऑईलपेन्टवाल्या फोटोच्या संदर्भात मल...

    पुढे वाचा »

गुरुवार, ५ ऑक्टोबर, २०२३

दोन गुलमोहर


  • ग्रेसचे ‘चर्चबेल’ वाचून बराच काळ लोटला. त्यातील काही अनुभव अधूनमधून मनाच्या तळातून पृष्ठभागावर येत असतात. अलीकडे विशिष्ट हेतूने व्यंकटेश माडगूळकरांची बरीच पुस्तके आणली. त्यातील ‘वाटा’मध्ये त्यांनी गुलमोहरावर एक सुरेख लेख लिहिला आहे. तो वाचून चर्चबेलमधला ग्रेसचा गुलमोहर आठवला. रोचक बाब म्हणजे या दोन लेखकांच्या मूलभूत प्रवृत्तीचे प्रतिबिंब या दोन लेखांत उमटलेले आहे. ग्रेस अंतर्मुख, त्यांच्या मनाच्या तळाशी जे रसायन मंदपणे उकळते त्याला वाट पुसतु जाणारे; तर माडगूळकर जगण्यातील अनुभवांकडे चालत जाणारे, त्यांना वेचून आपली पोतडी भरत जाणारे. ग्रेसचा गुलमोहर त्यांनी साक्षीभावाने अनुभवलेला, नेणिवेत मुळे रोवणारा; गाडगूळकरांचा क्रियाशील आमंत्रणानंतरही निसटून जाणारा. एकापाठोपाठ वाचण्यासाठी हे दोनही लेख इथे एकाच पोस्टमध्ये समाविष्ट केले आहेत. लहानपणी दहा-बारा वर्षांचा असताना मी कांचनवाडीला गेलो होतो. कांचनवाडीला नदी नाही आणि डोंगरही नाही. मला आवडणाऱ्या खेड्याच्या चित्रात किमानपक्षी एखादी नदी, नाहीतर पाण्याचा नदीसदृश प्रवाह, डोंगर आणि देऊळ असावय...

    पुढे वाचा »

बुधवार, २८ जून, २०२३

None was worth my strife...


  • पाईप ओढायला लागलो त्याला आता वर्षाचा काळ लोटून गेला. जाणीवपूर्वक ही सवय मी स्वतःला जडवून घेतली आहे. मी एकांतप्रिय माणूस आहे. त्याहीपेक्षा दिवसभराची वर्दळ एकदा शांत झाल्यावर आरामखुर्चीत बसून पाईप ओढणे आताशा मला आवडू लागले आहे. या सवयीचा उगम माझ्या मनोवृत्तीतच आहे. कुठलेही मानसिक किंवा शारीरिक दडपण असह्य झाले की, प्रत्येक माणूसच मुक्तीचा मार्ग शोधीत असतो. माझे तसे नाही. मुक्ततेचा जो नाग मी कवटाळतो तोच मुळी माझ्या वृत्तीचे एक इंद्रिय म्हणून माझ्या जीवनात स्थायिक होऊन जातो. मग माणसे असोत की वस्तू! एखादा अनाथ मुलगा आपल्याकडे वार लावून जेवीत असावा, आणि अचानक आश्रित म्हणून आपल्याच घरी कायमचा राहून जावा, तसाच हा प्रकार आहे. पण या प्रक्रियेत माझ्या बाबतीत एक गंमत नेहमीच घडून आली आहे. वस्तू व व्यक्तीच्या संबंधाचा जिथे नेमका व अटळ शेवट होतो तिथूनच माझ्या मनाला पालवी फुटू लागते! मग मानसिक संयोजनात मोठे चढउतार निर्माण होतात. त्याला इलाज नसतो. एकवेळ खूप चतुराई वगैरे दाखवून दुसऱ्यांनी रुजवलेली मुळे काढणे सोपे आहे. पण आपल्या आत्मभोगाच्या पाताळात उगवणारी ही सृष्टी नाहीशी करणे कठीण आहे ! ...

    पुढे वाचा »