-
गोव्यातला 'कलंगुट' हा प्रसिद्ध सागरकिनारा. दिवस कलला होता. उन्हे सौम्य झालेली होती... समोर निळा सागर गर्जत होता आणि वाळूत रंगीबेरंगी माणसे हिंडत होती. सोबतीला कोणी नसल्यामुळे मला फार एकटे वाटत होते. गोव्यात डेप्युटेशनवर येऊन मला महिना झाला होता. मुलाबाळांची आठवण येत होती. ह्या सुरेख, निसर्गरम्य प्रदेशात आपण एकटे का आलो? उद्योग-धंद्याच्या निमित्ताने आपण एवढे भटकतो; पण सदैव एकटे, असे का बरे ? गर्दीतून बाजूची जागा बघितली आणि वाळूत पाय रोवून बसलो. दोन्ही हात वाळूत खुपसले. निळ्या-निळ्या पाण्यावर दृष्टी पसरली. उगाचच ओळी ओठांवर आल्या- 'ने मजसी ने परत मायभूमीला सागरा, प्राण तळमळला. ' एवढ्यात चिमुकला, गोड आवाज आला, "अहो- " "का हो?" "जरा लक्ष ठेवा हं, माझ्या किल्ल्याकडं." "का? तुम्ही कुठं निघालात किल्ला सोडून?" त्या तिकडे हात वर करून ती म्हणाली, "मी जरा तिकडे जाऊन येणार आहे.' " "बरं, लवकर या." "आले लगेच." असे म्हणून ती चिमुरडी पोर केस उडवीत पळालीसुद्धा. नाव विचारण्यापुरता वेळही तिने मला ...
पुढे वाचा »
RamataramMarquee
‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - १३ : गरजा, मागणी आणि पुरवठा ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - १२ : जठराग्नी शमवाया भूतां ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - ११ : अद्यतनीकरण (Update) ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - १० : नव्या व्यवस्थेकडे ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - ९ : सर्वे सुखिन: सन्तु सण गेले विरुनी ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - ८ : धर्म आणि सहजीवन प्लरिबस’च्या निमित्ताने... - ७ : वैय्यक्तिक संपत्ती नि विषमता
वाळूचा किल्ला लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
वाळूचा किल्ला लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
रविवार, १८ जून, २०२३
वाळूचा किल्ला
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
