-
'ऋषीचं कूळ आणि नदीचं मूळ शोधू नये' अशी आपल्याकडे एक म्हण आहे. तरीही माणसं आपला इतिहास धुंडाळतात, हजारो वर्षांपूर्वीच्या कुण्या श्रेष्ठ व्यक्तीशी आपले नाते जोडून त्याला आपल्या वर्तमानातल्या अस्तित्वाचा आधार बनवू पाहतात. अनेक वर्षांच्या परंपरा असलेला समाज यात आपल्या अस्मितांची स्थानेही शोधत असतो. ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम या तीन 'बिब्लिकल' धर्मांचे आणि त्यांच्या असंख्य पंथोपपंथांचे श्रद्धास्थान असलेल्या 'जेरुसलेम' नगरीला या सार्या परंपरांमधे अनन्यसाधारण महत्त्व आहे. एकाच नगरीचे अस्तित्व आणि महत्त्व इतका दीर्घकाळ टिकून राहिल्याचे दुसरे उदाहरण इतिहासात नाही. त्यामुळे जेरुसलेमचा इतिहास हा श्रद्धाळूंच्या दृष्टीने जितका महत्त्वाचा तितकाच अभ्यासकांच्या दृष्टीनेही. पण जिथे श्रद्धांचा प्रश्न असतो तिथे त्या अभ्यासात वस्तुनि… पुढे वाचा »
RamataramMarquee
रमतारामाच्या विश्रांतीस्थळी:   
वारसा, जिज्ञासा आणि ज्ञान - १. वृद्धत्वाची जेथ प्रचिती... काव्य-मोतीचूर ऊर्फ काही ‘चविष्ट’ प्रेमकविता       चला दोस्तहो, खाण्यावरती बोलू काही       मूषकान्योक्ती       सुजन गवसला जो       क्रिकेटमधील उपेक्षितास दाद       बाबेलचा दुसरा मनोरा       Will He...?       To Dumbo, with Love       पहलगाम आणि आपण      
शनिवार, १ ऑक्टोबर, २०२२
वेचताना... : जेरुसलेम, एक चरित्रकथा
गुरुवार, २९ सप्टेंबर, २०२२
जेरुसलेम: सौंदर्यवती आणि वेश्या
-
इसवी सन पूर्व ८४१मध्ये जेझबेलची कन्या राणी अथालीया हिने जेरुसलेमची सत्ता काबीज केली. तिने डेव्हिड कुळातल्या सर्व राजकुमारांना ( तिच्या स्वतःच्या नातवंडांना) ठार मारून टाकलं. फक्त जेहोआश नावाच्या एकाच बाल राजकुमाराला तिच्या तावडीतून वाचवलं गेलं. ’बुक ऑफ किंग्ज द्वितीय’ या पुस्तकातून आणि उत्खननात सापडलेल्या नव्या पुराव्यांतून आपल्याला जेरुसलेममधल्या तेव्हाच्या जीवनाची थोडीशी कल्पना येते. ते छोटंसं बाळ मंदिराच्या परिसरात दडवून ठेवलेलं होतं. त्याच वेळी वंशाने अर्धी फिनिशियन आणि अर्धी इस्राइली असलेली ही जेझबेल-कन्या स्वतःच्या राजधानीत बाल नावाच्या देवतेची आराधना करण्यात आणि वेगवेगळ्या देशांबरोबर व्यापार करण्यात गर्क झाली होती. जेरुसलेममध्ये जेमतेम इंचभर लांबीचं, हस्तिदंती डाळिंबावर बसलेलं एक सुंदर ह… पुढे वाचा »
Labels:
अनुवाद,
जेरुसलेम,
पुस्तक,
सविता दामले,
सायमन माँटफिअरी
मंगळवार, १३ सप्टेंबर, २०२२
पांढरपेशांच्या Quicksand Pit ची गोष्ट
-
काही वर्षांपूर्वी 'चाहूल' नावाचे एक नाटक आले होते. साहेबाने प्रमोशनच्या बदल्यात बायकोला आपल्याकडे पाठवण्याचा प्रस्ताव दिलेला आहे. प्रथम संताप, हताशा, नंतर स्वार्थलोलुप शरणागती या मार्गाने पतीची झालेली अधोगती आणि त्याच्या स्वार्थात मिसळलेला स्वार्थ जाणून पत्नीचीही त्या प्रस्तावाकडे होत जाणारी वाटचाल असा काहीसा प्रवास त्यात उलगडत जातो. अलिकडेच 'रेगे' नावाचा एक मराठी चित्रपट आला होता. सुखवस्तू मध्यमवर्गीय अथवा उच्च-मध्यमवर्गीय घरातील दुबळ्या मनाच्या व्यक्तींना - विशेषत: तरुणांना - बाहुबलाचे असणारे आकर्षण (एक प्रकारचा स्टॉकहोम सिंड्रोम), त्या बाहुबलाने आपल्या अडचणी चुटकीसरशी सुटल्याने त्यावर बसलेली श्रद्धा आणि त्याची किंमत म्हणून त्या जाळ्यात कोळ्याच्या भक्ष्यासारखे फसत जाणॆ सुरेख मांडले होते. कोळ्याच्या जाळ्यात अडकलेल्यासमोर… पुढे वाचा »
गुरुवार, १ सप्टेंबर, २०२२
जागी झालेली मुले
-
काही वर्षांपूर्वी जीएंचे ’बखर बिम्म’ची वाचत असताना अचानक असं लक्षात की ’हां. हा एक माणूस काल्पनिका, परीकथा, पालक किंवा लाडू खाऊन ढिश्शुम करणारे हीरो वगैरे निव्वळ कल्पनासंचाराच्या पलिकडे जाऊन बिम्मच्या वास्तव-कल्पनेच्या तीरावरच्या जगाला भिडू पाहतो आहे. त्याला बिम्म समजला असेल, तर कदाचित त्याच्यामार्फत आपल्यालाही समजेल. मग एखाद्या बिम्म वा बब्बीचे म्हणणे मला अधिक नेमकेपणाने समजून घेता येईल.’ पण हाती येतो येतो आहे म्हणत असताना बिम्म निसटला नि गेली सात-आठ वर्षे कुठे तरी दडून बसला आहे. बिम्मची काल पुन्हा आठवण झाली. याचे कारण म्हणजे बिम्मसारख्याच कुण्या एका बब्बीचा फोटो मिळाला. बिम्मला आपली भाषा सापडली होती, हिला आपली अभिव्यक्तीही सापडली असावी असे वाटू लागले. बिम्मची भाषा त्याच्या आईला समजत असली, तरी त्यातील अभिव्यक्तीबाबत ती सर्वस्वी अज्ञ… पुढे वाचा »
सोमवार, २२ ऑगस्ट, २०२२
राष्ट्रीय एकात्मता - ३ : आम्ही सारे भारतीय अलग-अलग आहोत
-
सारे भारतीय माझे बांधव आहेत << मागील भाग काही महिन्यांपूर्वी राज्य सरकारने साहित्य संस्कृती मंडळ आणि मराठी विश्वकोश निर्मिती मंडळावर नियुक्त्या जाहीर केल्या, आणि रतीब घातल्यासारखा ’पार्शालिटी, पार्शालिटी’चा गजर झाला. निवड झाल्या-झाल्या प्रथम त्या निवडीकडे जातीय, विभागीय, धार्मिक, गट, शहर/गाव आदि भूमिकेतून पाहून, चोवीस तासांच्या आत त्यावर आक्षेप नोंदवणार्यांचे मला कौतुक वाटते. कुठलेही मंत्रिमंडळ स्थापन झाले, की त्यात कुठल्याशा ओसाडवाडीतील भकासगल्लीला वा कुठल्या तरी महान जातीला वा राज्याला/शहराला पुरेसे प्रातिनिधित्व मिळाले नाही, म्हणून राजकीय विरोधक कांगावा करतात. एखाद्या पुस्तकात वा चित्रपटात खलनायक वा खलनायिका आपल्या जातीची/धर्माची दाखवून आमच्या जाती-धर्माच्या भावना दुखावल्याचा कां… पुढे वाचा »
Labels:
जातीयवाद,
दृक्-श्राव्य,
राजकारण,
राष्ट्रीय एकात्मता,
समाज,
समाजकारण
बुधवार, १७ ऑगस्ट, २०२२
राष्ट्रीय एकात्मता - २ : सारे भारतीय माझे बांधव आहेत
-
अनेकता में एकता << मागील भाग मागील भागामध्ये शेअर केलेल्या ’अनेकता में एकता’, ’स्विम्मी’ आणि ’एकता का वृक्ष’ या तीनही चलच्चित्रपटांमध्ये एक समान धागा होता. एकजुटीचा, एकतेचा उद्घोष केला होता. यात एकत्र येणार्या व्यक्तिंना, पक्ष्यांना जोडणारा बाह्य धागा असा काही नव्हता. 'आपण सारे एक आहोत’ ही बांधिलकी मानणार्या सर्वांसाठी तो होता. एक प्रकारे ’मानव्याचे अंती एकच गोत्र’ हा अर्थ त्यातून ध्वनित होत होता. पण काळ पुढे सरकला तसे दूरदर्शनवर चलच्चित्रपट, लघुपट, माहितीपट अथवा देशोदेशीच्या प्रसिद्ध लेखकांच्या साहित्यावर आधारित कार्यक्रम पाहणारी पिढी मागे सरकली आणि हिंदी चित्रपटांच्या कृतक जगात रमणारी पिढी उदयाला आली. ज्याला बॉलिवूड असे म्हटले जाते त्या हिंदी फिल्म इंडस्ट्रीचा बोलबाला सुरू झाला. स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती मागच्या पिढी… पुढे वाचा »
Labels:
कला,
दृक्-श्राव्य,
राष्ट्रीय एकात्मता,
संगीत,
संस्कृती-परंपरा,
समाज
सोमवार, १५ ऑगस्ट, २०२२
राष्ट्रीय एकात्मता - १ : अनेकता में एकता
-
"भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत..." अशी एक प्रतिज्ञा आमच्या शालेय क्रमिक पुस्तकांत पहिल्या पानांवर छापलेली असे, कदाचित अजूनही छापली जात असेल. ही प्रतिज्ञा प्रसिद्ध तेलुगु कवी पी. वेंकट सुब्बाराव यांनी लिहिलेली आहे. १९६२ मध्ये लिहिलेली ही प्रतिज्ञा १९६३ मध्ये विशाखापट्टणम् मधील एका शाळेत सामूहिकरित्या म्हटली गेली. त्यानंतर तिला अधिकृतरित्या राष्ट्रीय प्रतिज्ञेचा दर्जा देऊन सर्व शालेय पुस्तकांच्या सुरुवातीला छापण्यात येऊ लागले. भारत माझा देश आहे। सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधार्… पुढे वाचा »
Labels:
चलच्चित्र,
दृक्-श्राव्य,
राष्ट्रीय एकात्मता,
समाज
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)