-
सारे भारतीय माझे बांधव आहेत << मागील भाग काही महिन्यांपूर्वी राज्य सरकारने साहित्य संस्कृती मंडळ आणि मराठी विश्वकोश निर्मिती मंडळावर नियुक्त्या जाहीर केल्या, आणि रतीब घातल्यासारखा ’पार्शालिटी, पार्शालिटी’चा गजर झाला. निवड झाल्या-झाल्या प्रथम त्या निवडीकडे जातीय, विभागीय, धार्मिक, गट, शहर/गाव आदि भूमिकेतून पाहून, चोवीस तासांच्या आत त्यावर आक्षेप नोंदवणार्यांचे मला कौतुक वाटते. कुठलेही मंत्रिमंडळ स्थापन झाले, की त्यात कुठल्याशा ओसाडवाडीतील भकासगल्लीला वा कुठल्या तरी महान जातीला वा राज्याला/शहराला पुरेसे प्रातिनिधित्व मिळाले नाही, म्हणून राजकीय विरोधक कांगावा करतात. एखाद्या पुस्तकात वा चित्रपटात खलनायक वा खलनायिका आपल्या जातीची/धर्माची दाखवून आमच्या जाती-धर्माच्या भावना दुखावल्याचा कांगावा करत धुडगूस घालणार्या सेना, ब्रिगेड वा संघटनांचा गल्ली-बोळांत ढेकणांसारखा बुजबुजाट झालेला दिसतो. माध्यमेही त्यांच्या त्या अस्मितेच्या गळूला, त्या नकारात्मतेला मूळ कलाकृतीपेक्षा अधिक वाव देणारी आहेत. ’हिंद देशके निवासी सभी जन एक है’ वगैरे म्हट...
पुढे वाचा »
RamataramMarquee
‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - १४ : अंत:स्फोटाची अपरिहार्यता ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - १३ : गरजा, मागणी आणि पुरवठा ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - १२ : जठराग्नी शमवाया भूतां ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - ११ : अद्यतनीकरण (Update) ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - १० :नव्या व्यवस्थेकडे ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - ९ : सर्वे सुखिन: सन्तु (साम्यवादी व्यवस्था) ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - ८ : धर्म आणि सहजीवन
जातीयवाद लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
जातीयवाद लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
सोमवार, २२ ऑगस्ट, २०२२
राष्ट्रीय एकात्मता - ३ : आम्ही सारे भारतीय अलग-अलग आहोत
Labels:
जातीयवाद,
राजकारण,
राष्ट्रीय एकात्मता,
समाज,
समाजकारण
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
