RamataramMarquee

गुरुवार, २ फेब्रुवारी, २०१७

वेचताना... : एक होता कार्व्हर


  • 'एका अर्वाचीन मराठी पुस्तकाची चाळीसावी(!) आवृत्ती मला परवा मिळाली.' हे विधान ऐकून बहुतेक वाचक दचकतील. चटकन तुकोबाची गाथा अथवा तत्सम अध्यात्मिक किंवा सुलभ कामसूत्र या दोन टोकांपैकी एखाद्या प्रकारचे पुस्तक असेल असा तर्क करून बहुतेक जण मोकळे होतील. पण मी चटकन 'अर्वाचीन' या शब्दाचा वापर केला आहे हे निदर्शनास आणून देईन.  हे पाहून बहुतेकांचा तर्क एखाद्या सेल्फ हेल्प प्रकारच्या पुस्तकाच्या अनुवादाकडे किंवा ’१००१ पाकक्रिया’ सदृश पुस्तकाकडे जाईल. पण हे दोन्ही तर्क चुकले आहेत असे मला सांगावे लागेल. अगदी अभ्यासक्रमाची पुस्तकेदेखील ठराविक काळानंतर बदलत असल्याने त्यांचे पुनर्मुद्रण देखील चाळीस वेळा होत नसावे. गुगल न करता तर्क करून पाहणाया बहुसंख्येला हे पुस्तक ओळखता येण्याची शक्यता जवळजवळ नाहीच. काही जणांचा तर्क इतस्ततः धावून आला असे… पुढे वाचा »

स्वातंत्र्यग्रस्त


  • इ.स. १८६५ च्या डिसेंबर महिन्यात निग्रोंच्या स्वांतत्र्याला अधिकृत मान्यता देण्यात आली. अमेरिकेतील गुलामगिरी नष्ट झाल्याचं घोषित करण्यात आलं. ज्यांना फक्त हुकूमच ऐकायची सवय होती, कपाशीत राबणं एवढाच ज्यांच्या आयुष्याचा अर्थ होता, अशा अडाणी निग्रो गुलामांना कायद्याने (घटनेने) स्वतंत्र केलं. पण स्वातंत्र्य उपभोगण्याची क्षमता त्यांच्यात एकाएकी कशी येणार! अडीच शतकं गुलामीत घालवलेल्या या चाळीस लाख लोकांपुढे मिळालेल्या स्वातंत्र्याने गंभीर समस्या उभ्या केल्या होत्या. ना अन्न, ना वस्त्र ना निवारा! भविष्यकाळासाठी तरतूद करायची असते हेही त्यांना कोणी शिकवलेलं नाही. प्रत्येक निग्रो विकला गेलेला. त्यामुळे कुटुंबव्यवस्था नाही. लग्नसंस्था नाही. यांच्या स्त्रिया म्हणजे मळेवाल्यांची मालमत्ता. कसलाच ठावठिकाणा नसलेला हा समाज मुक्त म्हणून रस्त्यावर आला. … पुढे वाचा »