RamataramMarquee

सूची: अनुक्रमे ▶ वेचे ▶ वेचताना ▶ दृक-श्राव्य ▶

सोमवार, २७ फेब्रुवारी, २०२३

सापळा


  • बाहेर रखरखीत ऊन होते, पण या दाट कोंडलेल्या अंधारात कोठे प्रकाशाचा कण नव्हता. हात पुढे करून चाचपडत प्रवासी थोडा पुढे सरकला, पण पायाखालची जमीन काचेची असल्याप्रमाणे निःशब्द, विलक्षण गुळगुळीत भासताच त्याच्या मनात भीती निर्माण झाली व तेथूनच मागे वळून निसटावे, असे त्याला वाटले. पण तेवढ्यात अनेक ठिकाणी तेजस्वी प्रकाशाचे पंखे उमटले, आणि त्या प्रकाशात भोवती पाहाताच विलक्षण भयाने त्याच्या अंगातील शक्तीच ओसरून गेली. भोवती इंद्रजाल निर्माण झाल्याप्रमाणे त्याच्याच सहस्र आकृती उमटल्या. त्याने बावरून डोळ्यांवर बोटे धरताच कानाकोपऱ्यात अनंत हालचाली झाल्या व प्रकट झालेल्या आकृत्यांनी निरनिराळ्या तर्‍हांनी बोटे उचलली. कारण भोवती सर्वत्र निरनिराळ्या कोनांत बसवलेले, छतापर्यंत पोहोचलेले भव्य आरसे होते. सर्वत्र प्रकाश होता, पण तो नेमका कोठून येत आहे हे समजत नव्हते. आणि या सार्‍यावर धुपाचा गंध असलेल्या धुराचे तलम पदर तरंगत होते. प्रवाशाने सारे धैर्य एकवटले व तो मागे वळून धावला. तोच दोन आरसे सहजपणे त्याच्या समोर सरकले व त्यावर आदळून प्रवासी मागे फेकला गेला. आता भोव...

    पुढे वाचा »

रविवार, १९ फेब्रुवारी, २०२३

माकडिणीची कथा


  • नेमकी आजच मोलकरीण आली नव्हती, आणि घरातील सगळीच पिठे संपून बसली होती. म्हणून आईला गिरणीकडे तीन चार फेऱ्या कराव्या लागल्या. त्यात भर म्हणजे गल्लीतील सगळ्याच मोलकरणी गैरहजर असल्याप्रमाणे गिरणीत आज खूपच गर्दी होती, व तेथे ताटकळत राहून तिचे गुडघे मेणाचे झाले होते. मग घरी मुलांची जेवणे झाली, ती नेहमीप्रमाणे अगदी साग्रसंगीत झाली. बिम्मने पाण्याचा तांब्या टेबलावर लवंडला. बब्बीला आमटीच्या वाटीत शेवग्याच्या शेंगेचा एकच तुकडा आला होता तर बिम्मच्या वाटीत दोन तुकडे अगदी स्पष्ट दिसत होते. त्यांनी वाटीची ओढाताण केली, तेव्हा दोघांच्याही कपड्यांवर आमटी सांडली. आपापली ताटे उचलून ती मोरीत ठेवण्यासाठी जात असता बिम्मचे ताट वाटेतच खाली पडले. अखेर जेवणे संपली व मुले झोपायला वर गेली. तिने एक सुस्कारा सोडला असेल नसेल, तेव्हा गेट वाजले, व दारावरची घटा झणझणली. कपाळाला हात लावत आईने दार उघडले, तर वाणी दुकानदार समोर उभा ! तो म्हणाला, “तुमच्या यादीप्रमाणे सामान आणल आहे मी! उद्या गुरुवार, दुकान बंद. तेव्हा तुमची अडचण नको; म्हणून मीच सगळ्या पिशव्या सायकलीला अडकवून स्वतः आलो. कुठे ठेवू हे सामान?" "सगळे ...

    पुढे वाचा »