RamataramMarquee

बुधवार, २९ जून, २०१६

बहुमत


  • एकदा असंख्य कावळे मानससरोवराजवळ जमले. त्या ठिकाणी शुभ्र पंखांचा, लाल चोचीचा एक हंस आपल्या हंसीबरोबर जलक्रीडा करत होता. कावळ्यांनी एकदम कलकलाट केला नि त्यांनी हंसास मानससरोवर सोडून जाण्यास सांगितले, कारण त्यांच्या आगमनाच्या क्षणापासून मानससरोवरावर त्यांची सत्ता चालू झाली होती. "अनादिकालापासून मानससरोवर हंसांसाठीच आहे." हंस म्हणाला. 'शिवाय तुम्हाला पोहता येत नाही, तर मानससरोवर हवे कशाला?" "आम्हाला पोहता येत नसेल, पण त्याचा आणि स्वामित्वाचा काय संबंध आहे? आपल्या सत्तेची नृत्यशाला अथवा गायनशाला असेल तर आपल्याला नृत्य-गायन आलंच पाहिजे असं कोठे आहे?" कावळ्यांच्या नेत्याने राजकारणी हसून विचारले. हा नेता मोठा व्युत्पन्न होता व त्याने कृष्णद्वीपात जाऊन न्याय… पुढे वाचा »

मंगळवार, २८ जून, २०१६

एका पानाचा मृत्यू


  • असंच खचलेलं एक सागवानाचं पान बाजूला लाल मातीवर साचलेल्या पाण्यात पडलं. ऊन आधीपासूनच तिथं पडलेलं होतं. पानानं जागा घेतल्यावर ऊन पानावर. पान पांढरं. बाकीच्या खचलेल्या पानांच्या तुलनेत छोटं. शिरा स्पष्ट. पानाच्या घडबडीत कडा. वरची कड पाण्यात अशी बुडालेली की खरी ती कुठली नि प्रतिबिंब कुठलं ते कळू नये. शेजारी एक काटकी, मळकी. कधीकधी पाटात एखादं पान असं मधेच अडकून पडतं कशाला तरी. दगडाला, फांदीला किंवा असंच कशाला तरी. पण इथं तर पाणी साचलेलंच होतं. आणि पाऊस पडलेला नसल्यामुळं ठप्पच असलेल्या पाण्यात ते पान निवांत. हे पान नक्की कुठल्या सागवानाच्या झाडाचं असेल? झाडाला असलेली त्याची गरज संपल्यावर ते गळून गेलं असेल का? झाडानंच त्याला गळायला लावलं असेल का? हे पान पडलं तिथंच कसं पडलं? झाडाला ते कधीपासून फुटायला … पुढे वाचा »

काजळवाट


  • बोट बंदरातून बाहेर काढली तरी कार्मोन टेपरिकॉर्डर लावत नसे. सेंट्रल पार्कवरून येणारे संगीताचे स्वर आकाशात भरून राहिलेले असत. आणि त्यांची लय कार्मोनला बिघडवायची नसे. सेंट्रल पार्कमधून येणार्‍या त्या स्वरांनी बोटीतील वातावरण देखील भारलं जाई. बोट मीरामारच्या आसपास येई तेव्हा सेंट्रल पार्कवरून येणारे स्वर अगदी मंदावल्यासारखे होत आणि कार्मोन टेपरिकॉर्डर चालू करी. तो ही अशा खुबीने की सेंट्रल पार्कमधून येणार्‍या संगीताचे स्वर संपले कधी आणि टेपरिकॉर्डरवरचे स्वर सुरू झाले कधी हे कोणाच्याच लक्षात येत नसे. बोटीच्या दुसर्‍या किंवा तिसर्‍या फेरीत केव्हा तरी सूर्य पश्चिम क्षितिजाला टेकू लागे. सारं पणजी शहर तेव्हा पेटून उठल्यासारखं वाटे. पिवळ्या रंगानं प्रदीप्त झाल्यासारखं वाटे. दिवसाउजेडीच्या या फेर्‍या किती… पुढे वाचा »