-
त्यांनी ‘ चिमुकलीच कविता ’ शिकवायला घेतली ती या वर्षातील शेवटचीच कविता होती. नव्हे, ती शाळेतीलच शेवटची कविता होती. “यात एक ओळ फार झगझगीत आहे.” तातू हळूच म्हणाला. तो शेजारी बसला होता खरा, पण मनाने तो दूर कुठे तरी निघून गेला होता. कविता संथपणे चालली होती. गोंडस नाजुक चिमणी बाला हळूहळू स्पष्ट होत चालली. केस सरळच, पण काही मात्र कुरळे. कच्च्या पोवळ्यांच्या चकत्या करून लावल्याप्रमाणे वर्खी नखे (नखे लाखिया, दात मोतिया, आणि स्तनाकार पेले... यांची जपानी रमलाची रात्र चिमुकलीच कविता मोठी झाल्यानंतरची) विशेष प्रतिकार न करता, पण फारसे न झंकारता आम्ही त्या संथ ओळी ऐकत होतो, मग कसलीच चाहूल न दाखवता ती ओळ आली व सारे अंग थरारून गेले. तिच्या हनुवटीवरील तीळ म्हणजे तिच्या पुण्याईचे गणित करत असता विधीने दिलेले दशांश चिन्ह कमळाच्या परागतंतूंतील एक विजेच्या झळाळीने उजळ झाल्याप्रमाणे मी अगदी बावरून गेलो व सारेच विसरलो. नंतर बऱ्याच वर्षांची गोष्ट आहे. खऱ्या काव्याचे लक्षण कसे ओळखावे, हे आपल्यापुरते सांगताना ए. ई. हाउसमनने म्हटले आहे : एखादी ओळ आठवता...
पुढे वाचा »
RamataramMarquee
नेकी कर और गटर में डाल ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - परिशिष्ट : ‘पदार्पण’ : एक कल्पनाविस्तार (उत्तरार्ध) ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - परिशिष्ट : ‘पदार्पण’ : एक कल्पनाविस्तार (पूर्वार्ध) ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - १५ : उपसंहार ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - १४ : अंत:स्फोटाची अपरिहार्यता ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - १३ : गरजा, मागणी आणि पुरवठा ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - १२ : जठराग्नी शमवाया भूतां ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - ११ : अद्यतनीकरण (Update)
बुधवार, २५ सप्टेंबर, २०२४
दशांशचिन्हांकित कविता आणि प्रमेय-प्रत्यंतर
Labels:
अनुभव,
जी. ए. कुलकर्णी,
पुस्तक,
माणसेः अरभाट आणि चिल्लर
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
