-
ट्रिलजी किंवा तीन भागातील विस्तृत कथानक मांडणी हा प्रकार तसा अप्रचलित नसला तरी दुर्मिळ आहे. सिनेमा (सत्यजित रे यांची अपू ट्रिलजी), नाटक (एलकुंचवारांची वाडा ट्रिलजी) तसेच कादंबरी (मुक्तिबोधांची बिशू ट्रिलजी) अशा बहुतेक कलामाध्यमांतून हा प्रयोग होत आला आहे. मराठी साहित्यातील ग्रॅंड ओल्ड मॅन भालचंद्र नेमाडे यांनी आणखी एक पाऊल पुढे टाकत ’चांगदेव चतुष्टय’ म्हणून ओळखल्या जाणार्या चार कादंबर्या लिहिल्या. (श्री. ना. पेंडसे यांची तुंबाडचे खोत ही चार भागातील विस्तीर्ण कादंबरी एक प्रकारे चतुष्टयच आहे.) एका विस्तीर्ण अशा पटावर एखादी व्यक्ती, एखादा भूभाग किंवा समाजव्यवस्था यांची स्थित्यंतरे कवेत घ्यायची, तर एखादी कादंबरी पुरेशी होत नाही. अशा वेळी त्या कथनाचे टप्पे कल्पून त्या भोवती स्वतंत्र उभ्या राहतील अशा कलाकृती निर्माण करणे, हे सर्वसामान्य कलाकाराला झेपणारे काम नव्हे. इथे सर्जनशीलतेसोबतच चिकाटी, चोख हिशोबीपणाही अंगी असावा लागतो . एवढ्या विस्तीर्ण मांडणीमध्ये कुठे विसंगती येऊ नये, कथानकाचा ओघ आणि धाटणी दोन्ही बदलू नये याची डोळ्यात तेल घालून का...
पुढे वाचा »
RamataramMarquee
‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - १२ : जठराग्नी शमवाया भूतां ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - ११ : अद्यतनीकरण (Update) ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - १० : नव्या व्यवस्थेकडे ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - ९ : सर्वे सुखिन: सन्तु सण गेले विरुनी ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - ८ : धर्म आणि सहजीवन प्लरिबस’च्या निमित्ताने... - ७ : वैय्यक्तिक संपत्ती नि विषमता ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - ६ : समूह नव्हे व्यक्ती; गरज नव्हे संपत्ती
शुक्रवार, १७ नोव्हेंबर, २०१७
वेचताना... : डांगोरा: एका नगरीचा
विहीरीतले बेडूक
-
साइखेडात सगळाच अंधार होता असं नाही. जळतेपण क्षीण होतं आणि जागेपण बावरलेलं. जिथे कुठे चडफड होती ती भवतीच्या दाट ओल्या पासोडीखाली चिमून चाललेली. शंभुराव जाधव काय, हरिभट ग्रामोपाध्ये काय, तिरीमिरीवर येणारे, भडकील्या डोक्याचे म्हणून प्रसिद्ध होते. लोक त्यांना मानायचे. पण त्यांच्यामागून पावलं टाकायची हिंमत त्यांच्यात नव्हती. अग्नी अग्नीच असतो. पण वेळीच इंधन मिळेल तर. साइखेड हे एखाद्या बेटासारखं. बाकीच्या जगापासून विलग झालेलं... आपल्याच ठिकाणी उसाभरी करणारं. तरी त्यात इतिहासातले द्वेष पुन:पुन्हा वस्तीला येत. जातीचा झेंडा ज्याच्या त्याच्या हाती. त्यामुळे आपल्या कळपातल्याहून इतर सगळे तुच्छ आणि हीन. सत्ता आणि धन यासाठी केलेली चाल ती पुण्यमार्गावरची. वासनांचा संतोष हाच एक विसावा. अशा समाजात सदाच भयाचं वातावरण लपेटून राहणार यात शंका कसली? भयाला नेहमीच हिंसेचं काळंगडद अस्तर असतं. अशानं भूमी दिवसरात्र द्वंद्वासाठी सजलेली असते. तिच्यावर सुंदर जीवनाची रोपं अंकुरणार कशी? कोणत्याही क्षणी, कोणत्याही वळणावर आणीबाणी छातीवर बसेल अशी व्यवस्था. एका सिद्धपु...
पुढे वाचा »
Labels:
कादंबरी,
डांगोरा: एका नगरीचा,
त्र्यं. वि. सरदेशमुख,
पुस्तक
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
