-
समोरच्या झाडातून बुलबुल साद घालू लागला म्हणून गॅस बारीक करून मी गॅलरीत आले. त्याचे गाणे चालूच होते. त्या सुराच्या दिशेने खूप शोधले, पण तो कुठेच दिसेना. हा त्याचा नेहमीचच खेळ आहे. आणि मीही वेडी दर वेळी अशी धावत येते, फसवली जाते आणि मग वैतागतेही. आज मात्र काय झाले कोण जाणे, न रागावता तिथेच डोळे मिटून स्वस्थ बसले. मग त्या गोड सुरांची, समोरच्या त्या झाडांची, झाडांमागल्या आकाशाची, त्यात बागडणाऱ्या ढगांची, त्यांतून कोसळणाऱ्या जलधारांची, त्यांना पोटाशी पेणाऱ्या माझ्या धामापूरच्या तलावाची, त्यातल्या इवलाल्या माशांची, तिथल्या त्या संरक्षक टेकड्यांची, त्यांच्या कुशीतल्या, माझ्या रक्ताशी नाते सांगणाऱ्या, लाल लाल पाऊलवाटांची– साऱ्या साऱ्या आसमंताची, पंचमहातत्त्वांची सावली त्या मिटल्या डोळ्यांतून अलगद आत उतरली. ती अंतर्बाह्य पांघरून मी निवान्त हलकी हल… पुढे वाचा »
RamataramMarquee
रमतारामाच्या विश्रांतीस्थळी:   
वारसा, जिज्ञासा आणि ज्ञान - १. वृद्धत्वाची जेथ प्रचिती... काव्य-मोतीचूर ऊर्फ काही ‘चविष्ट’ प्रेमकविता       चला दोस्तहो, खाण्यावरती बोलू काही       मूषकान्योक्ती       सुजन गवसला जो       क्रिकेटमधील उपेक्षितास दाद       बाबेलचा दुसरा मनोरा       Will He...?       To Dumbo, with Love       पहलगाम आणि आपण      
गुरुवार, ७ नोव्हेंबर, २०२४
अंतरीच्या या सुरांनी
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)