-
“हे जीवघेणं गाणं आहे!... हो ना?” “हो!” “हे ऐकलं की एका मिनिटानं आयुष्य कमी होतं आणि अर्ध्या मिनिटानं वाढतं!” जगण्यात काही क्षण असे सापडतात की तिथे अचानक स्तिमित होऊन माणूस स्तब्ध होतो. ‘कल और आएंगे नग्मोंकी खिलती कलियाँ चुननेवाले । मुझसे बेहतर कहनेवाले, तुमसे बेहतर सुननेवाले ॥’ म्हणत साहिरने माझ्यातल्या बुतशिकनला बुत बनवून ठेवला होता. वरची दोनच वाक्ये समोर ठेवून सासणेंनी मला पुतळाच बनवून ठेवले. काही वर्षांपूर्वी ‘सनसेट बुलेवार्ड’ नावाचा एक चित्रपट पाहिला होता. मूकपटांच्या जमान्यातील कुणी प्रसिद्ध नटी, नॉर्मा. बोलपटाच्या आगमनानंतर झालेल्या तंत्रबदलातून जी वावटळ निर्माण झाली, त्यातून चंदेरी दुनियेतून पाचोळ्यासारखी बाहेर फेकल्या गेलेल्यांपैकी एक. अत्यंत आत्मकेंद्रित, आपल्याच विश्वात जगणारी नॉर्मा वास्तव जगापासून पार अलिप्त आहे. या जगात आता तिला कणभर स्थान नाही याचे तिला भान नाही. जर ते आले, तर तिच्या भूतकाळाचा तिनेच रंगवलेला पडदा फाटून तिला एग्जिट घ्यावी लागेल अशी शक्यता आहे. हे ठाऊक असलेला तिचा माजी दिग्दर्शक, माजी नवरा, अक्षरश: तिचा नोकर बनून तिला जगवतो आहे; तिच्या श्रेष्ठत्वाचा...
पुढे वाचा »
RamataramMarquee
‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - १२ : जठराग्नी शमवाया भूतां ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - ११ : अद्यतनीकरण (Update) ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - १० : नव्या व्यवस्थेकडे ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - ९ : सर्वे सुखिन: सन्तु सण गेले विरुनी ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - ८ : धर्म आणि सहजीवन प्लरिबस’च्या निमित्ताने... - ७ : वैय्यक्तिक संपत्ती नि विषमता ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - ६ : समूह नव्हे व्यक्ती; गरज नव्हे संपत्ती
बुधवार, १८ सप्टेंबर, २०१९
वेचताना... : नॉर्मा आणि कम्मो
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
