-
रक्ताने किंवा कायद्याने बांधलेली नातीच फक्त प्रेमाची धनी नसतात. प्रेमाच्या अनेक छटा आसपास विखुरलेल्या दिसतात. नैसर्गिक प्रेरणेला विसरुन, एखाद्या हरणाच्या पाडसाला दत्तक घेणार्या सिंहिणीचा वीडिओ मी पाहतो, तेव्हा त्या नात्याच्या अगम्यतेने स्तिमित होत असतो. थेट भिन्नवंशीय प्राण्यांतील हे प्रेम दूरचे राहिले, पण माणसानेच कृत्रिमरित्या निर्माण केलेल्या गटांच्या भिंती भेदून जाणारे प्रेम, स्नेह, बंध, आत्मीयता, हे देखील हिंसेइतकेच, लैंगिकतेइतकेच आदिम आहेत . पण आजच्या स्वयंघोषित वास्तववादी साहित्यिकांच्या खिजगणतीतही ते नसतात. आदिम प्रेरणा नि जाणीवा म्हणत सदैव हिंसेचा, लैंगिकतेचाच वेध घेणे हीच प्रागतिक साहित्याची खूण का मानली जाऊ लागली आहे, हा प्रश्न मला वारंवार पडत असतो. रुक्मिणीच्या लालस ओठांवर करावं, वक्रतुंडाच्या हास्यास्पद पोटावर करावं, गाईच्या नेत्रातील अथांग कारुण्यावर करावं, मोराच्या पिसा-यातील अद्भुत लावण्यावर करावं, प्रेम काळजाच्या नात्यावर करावं, प्रेम खड्गाच्या पात्यावरही करावं, प्रेम कुणावरही करावं -कुसुम...
पुढे वाचा »
RamataramMarquee
‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - १२ : जठराग्नी शमवाया भूतां ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - ११ : अद्यतनीकरण (Update) ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - १० : नव्या व्यवस्थेकडे ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - ९ : सर्वे सुखिन: सन्तु सण गेले विरुनी ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - ८ : धर्म आणि सहजीवन प्लरिबस’च्या निमित्ताने... - ७ : वैय्यक्तिक संपत्ती नि विषमता ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - ६ : समूह नव्हे व्यक्ती; गरज नव्हे संपत्ती
रविवार, १३ डिसेंबर, २०२०
वेचताना... : अडीच अक्षरांची गोष्ट
शनिवार, १२ डिसेंबर, २०२०
रावी के दो किनारे
-
सचिन कुंडलकर यांचा 'गंध' पाहात होतो. त्यात मिलिंद सोमणने 'रावी के उस पार...' चे एक जेमतेम एक कडवे म्हटले आहे. त्यातल्या रावीऽऽऽ वरची ती मींड काळजावर घाव घालून गेली. दुसर्यांदा ऐकताना बेट्याने काय कमाल केली आहे असे वाटून गेले. Raavi Ke Uspaar Sajanva Film: Gandha (2009). वाटलं हा केवळ सर्वसाधारण अभिनेता असलेला माणूस ही जागा अशी वेधक घेऊ शकतो, तर मूळ गाण्यात काय बहार येत असेल. मग मूळ गाणे शोधायला गेलो. पत्ता लागला मूळ गाणे रावी के 'इस' पार आहे, 'उस'पार नव्हे! याची गायिका उमराव ज़िया बेगम पाकिस्तानी आहे हे ध्यानात घेतले तर हा भेद समजून जातो. (कुंडलकरांनी हा बदल हेतुत: केला असावा का?) Singer: Umrao Zia Begum रावी के इस पार, सजनवा रावी के इस पार प्रेम का दरिया, प्रेम की नैया प्रेम का चापू (१) , प्रेम खेवैया (२) आजा कर के पार, सजनवा बूढे जागे, बालक जागे मेरे बा...
पुढे वाचा »
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)

