-
पुल्देसपांड्यांना बहुतेक मराठी माणसे 'हशिवनारा बाबा' म्हणून ओळखतात, आमच्यासारखा एखादा त्यांना बोरकर-मर्ढेकरांच्या कविता जिवंत करणारा रसिक म्हणून ओळखतो. आपल्या आसपास बाकीबाब-आरती प्रभू-मर्ढेकर यांसारखे कवी आणि भीमण्णा-मन्सूरअण्णा-कुमार गंधर्व आणि प्रिय मित्र वश्या देशपांडे ऊर्फ वसंतखाँ अशा व्यक्ती आणि वल्लींना जमा करून आयुष्याचा काव्यशास्त्रविनोदाचा महोत्सव जगणारा अवलिया म्हणून ओळखतो. कुणी त्यांना आणीबाणीच्या काळातला साहित्यिकांचा एक आवाज म्हणून ओळखतो, परंतु त्या तुलनेत त्यांना नाटककार म्हणून तितकेसे ओळखले जात नाही. खरे तर हे अनाकलनीय आहे. कदाचित याचे एक कारण म्हणजे त्यांची बहुतेक नाटके ही अनुवादित वा रूपांतरित आहेत हे असू शकते. 'इन्स्पेक्टर जनरल' वरून अंमलदार, ’थ्री पेनी ऑपेरा'वर बेतलेले 'तीन पैशाचा तमाशा', ’पिग्मॅलियन'चे अस्सले देशी रूप 'फुलराणी' यांसारखी नाटके गाजली. पण 'तुझे आहे तुजपाशी' सारखे स्वतंत्रपणे (अनुवादित नसलेले) नाटकही लोकांनी डोक्यावर घेतले गेले. ’एक झुंज वार्याशी’ तर नाट्यस्...
पुढे वाचा »
RamataramMarquee
‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - १२ : जठराग्नी शमवाया भूतां ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - ११ : अद्यतनीकरण (Update) ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - १० : नव्या व्यवस्थेकडे ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - ९ : सर्वे सुखिन: सन्तु सण गेले विरुनी ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - ८ : धर्म आणि सहजीवन प्लरिबस’च्या निमित्ताने... - ७ : वैय्यक्तिक संपत्ती नि विषमता ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - ६ : समूह नव्हे व्यक्ती; गरज नव्हे संपत्ती
रविवार, ८ नोव्हेंबर, २०२०
वेचताना... : सुंदर मी होणार
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
