-
वेगवेगळी फुले उमलली रचुनी त्यांचे झेले एकमेकांवरी उधळले गेले... ते दिन गेले... भ. श्री. पंडितांची ही कविता जेव्हा केव्हा ऐकते, तेव्हा तेव्हा गेल्या दिवसांविषयीची माणसाच्या मनातली हुरहूर किती सार्वत्रिक आहे, हे जाणवून मी नवल करीत राहते. अगदी लहान असताना रानात एकट्या पडलेल्या लाकूडतोड्याच्या मुलाची गोष्ट मी ऐकली होती. एक लहानगा सुंदर पक्षी त्याला मित्र मिळाला आणि न पाहिलेल्या जगाविषयीची किती तरी अद्भुत गाणी न् गोष्टी लाकूडतोड्याचा मुलगा त्या पाखराकडून ऐकत राहिला. मग त्याला वाटलं की, या पाखराला कायमचंच जवळ का नये ठेवू? त्यानं एक सुरेख पिंजरा बनवला, पण पाखरानं तो पिंजरा पाहिला मात्र, ते जे उडून गेलं, ते परत कधीच त्या मुलाला भेटलं नाही. लहानपणी ऐकलेल्या त्या गोष्टीतली अद्भुतता आणि सुंदरता आता उरलेली नाही मनात; पण वाटतं की, आपण माणसंही पुष्कळ वेळा त्या लाकूडतोड्याच्या मुलासारखी होतो. हातून निसटलेलं आयुष्य पकडून कायमचं जवळ ठेवण्याची तीव्र इच्छा करणारी, जुने निर्मळ आनंद साठवून हुरहुरणारी माणसं. आमचे देव तरी आमच्यापेक्षा वेगळे कुठे आहेत ? भव...
पुढे वाचा »
RamataramMarquee
‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - १२ : जठराग्नी शमवाया भूतां ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - ११ : अद्यतनीकरण (Update) ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - १० : नव्या व्यवस्थेकडे ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - ९ : सर्वे सुखिन: सन्तु सण गेले विरुनी ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - ८ : धर्म आणि सहजीवन प्लरिबस’च्या निमित्ताने... - ७ : वैय्यक्तिक संपत्ती नि विषमता ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - ६ : समूह नव्हे व्यक्ती; गरज नव्हे संपत्ती
मंगळवार, ८ ऑक्टोबर, २०२४
गेले... ते दिन गेले
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
