-
"वासंती मेली." बाळ्यानं पहिल्यांदाच फटकन सांगितलं. नान्याचा चेहरा कोवळाकोवळा होऊन गेला. "पुढं ऐक. आम्हाला कुणालाच माहीत नाही ती आजारी आहे हे. चाळीतली माणसं पहिल्यांदा थोडी बुचकळ्यात पडली. हिचं झालं काय? ही येत का नाही? ही माणसं भलतंच काही समजली. कुजबूज सुरू. हे चाळीचं म्हणजे एकदम ठेवणीतलं. सांगतो काय. या लोकांना अकलाच नाहीत..." मधेच सुधा दारापाशी गेली. तिनं दाराला कड्या आहेत की नाही हे पाहिलं. "हळू बोला. आपल्याला राहायचंय इथं-" खालच्या मानेनं सांगून ती कपाटाआड वावरु लागली. "उठवलं कुणीतरी- वास्याला दिवस गेलेत. पाहायला मात्र पहिल्यांदा कुणीच गेले नाहीत हं. वार्ता चाळभर. या चाळीतून वार्ता त्या चाळीत प्लेगच्या उंदरासारखी पडली. मग काय, त्या चाळीतदेखील तेच. आमच्या विसूनानांच्या कानावर जाऊन ही वार्ता थडकली. ’रवये नम:*’ तरी काय? त्यांनी तोच संशय घेतला. पोर जेवत नाही. काही खात नाही. पावलं सुजलीत. झालं, म्हाताराही बिघडला. अजब या लोकांचं. बरं आमच्या या सात-आठ पोरांच्या आयाबायादेखील त्यांच्यातल्याच. माय गॉड! बातम...
पुढे वाचा »
RamataramMarquee
‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - १२ : जठराग्नी शमवाया भूतां ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - ११ : अद्यतनीकरण (Update) ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - १० : नव्या व्यवस्थेकडे ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - ९ : सर्वे सुखिन: सन्तु सण गेले विरुनी ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - ८ : धर्म आणि सहजीवन प्लरिबस’च्या निमित्ताने... - ७ : वैय्यक्तिक संपत्ती नि विषमता ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - ६ : समूह नव्हे व्यक्ती; गरज नव्हे संपत्ती
शुक्रवार, १९ ऑक्टोबर, २०१८
बळी
Labels:
कादंबरी,
चिं. त्र्यं. खानोलकर,
त्रिशंकू,
पुस्तक
मंगळवार, १७ एप्रिल, २०१८
सोयरे वनचरी
-
त्या रात्री बुधा एकदम जागा झाला. त्यानं चिमणी लावलीच नव्हती. बकर्यांचे श्वास त्याला ऐकू येत होते. पण त्याला असं वाटलं, की कुणी तरी दाराशी येऊन उभं राहिलं आहे. तो कसाबसा धडपडत अंथरुणावर उठून बसला. कण्हत कण्हत, खोल स्वरात त्यानं विचारलं, "कोन हाय त्ये?" पण उत्तर आलं नाही. कारण कुणीच आलं नव्हतं. बुधाला आपलं उगीचच वाटलं होतं. मग तो पुन्हा अंथरुणावर पडला. बाहेर पावसाच्या सरीवर सरी कोसळत होत्या. कड्यावरून पाणी खाली झेपावत होतं. त्याचा केवढा तरी आवाज होत होता. बुधाला एकदम वाटलं की उठावं, अन् आपल्या कुत्र्याची समाधी जागेवर आहे किंवा नाही ते पाहून यावं. आपल्या आवळीबाईला भेटून यावं. त्यानं उठायची धडपड केली. पण त्याला असं जाणवलं की सगळ्या इंद्रियांच्या शक्ती शरीराला सोडून चालल्या आहेत. मग तो नुसताच पडून राहिला. बाहेर पावसाच्या चळका झरत राहिल्या. काही वेळानं एकदम बुधाच्या मनी उभं राहिलं, की मघाशी कोण आलं असावं? भूतचार? नव्हे नव्हे! मग कोण बरं ते! अन् अचानक बुधाला तुकारामबाबाचा अभंग आठवला- "वृक्षवल्ली आम्हां वनचरे स...
पुढे वाचा »
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)

