-
जी.ए. कुलकर्णी यांचे कथाकार म्हणून स्थान अनन्यसाधारण आहे. त्याचबरोबर त्यांचे एकांडेपण नि एकारलेपण हे मराठी साहित्यप्रेमींच्या अवाजवी कुतूहलाचा विषय बनून राहिले आहे. त्यांचा तो काळा चष्मा, त्यांच्या न झालेल्या भेटीचे सुरस चमत्कारिक किस्से चवीने चघळणे हे कधी वैचित्र्यप्रेमापोटी, तर कधी छुप्या असूयेपोटी होत असते. इंग्रजीत ज्याला introvert किंवा अगदी self-centered म्हणता येईल– मराठीमध्ये आत्मसंतुष्ट नव्हे पण आत्ममग्न– असे हे व्यक्तिमत्व, विक्षिप्तपणाच्या कथांचे नायक बनलेले. याउलट सुनीताबाई देशपांडे या करकरीत बुद्धिवादी, लोकांच्या गराड्यात राहूनही त्या-त्या व्यक्तीच्या कुवतीनुसार संवाद राखू शकणार्या, प्रसंगी कणखरपणे तो तोडण्यासही मागेपुढे न पाहणार्या. पुरुषप्रधान मानसिकतेच्या समाजात ‘पु.ल. देशपांडे यांची पत्नी’ हीच ओळख असलेल्या. कवि नि कवितांशी - जी.एं.च्याच भाषेत - आतड्याचे बंध असलेल्या; बुद्धिप्रधान व विवेकप्रधान विचाराच्या असून त्याचे करकरीत शुष्क तत्वज्ञानात रूपांतर होऊ न देणार्या. (याचे प्रत्यंतर घ्यायचे तर त्यांचा ‘ मनातलं अवकाश ’ हा ललितलेख-संग्रह पाहा.). पु.लं.ना जी.एं.चे आले...
पुढे वाचा »
RamataramMarquee
‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - १२ : जठराग्नी शमवाया भूतां ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - ११ : अद्यतनीकरण (Update) ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - १० : नव्या व्यवस्थेकडे ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - ९ : सर्वे सुखिन: सन्तु सण गेले विरुनी ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - ८ : धर्म आणि सहजीवन प्लरिबस’च्या निमित्ताने... - ७ : वैय्यक्तिक संपत्ती नि विषमता ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - ६ : समूह नव्हे व्यक्ती; गरज नव्हे संपत्ती
शुक्रवार, ६ डिसेंबर, २०२४
दूरस्थ कुणी दे तुझ्या करी...
Labels:
अरुणा ढेरे,
पुस्तक,
प्रस्तावना,
प्रिय जी. ए.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
