-
इंटरनेट नि समाजमाध्यमे, डिजिटल माध्यमांतून होत असलेला माहिती नि मनोरंजन यांचा भडिमार यांच्या प्रपाताआड वाहून गेलेली वाचनवृत्ती पुनरुज्जीवित करण्यासाठी, वाचनाची बैठक बसवण्यासाठी सोप्या गोष्टीस्वरूप साहित्यापासून सुरुवात करावी असा विचार केला. अमेजनने अमीशच्या नागा-त्रयी अथवा शिवा-त्रयीची शिफारस केली. पुराणकथेची निव्वळ फेरमांडणी असावी असा विचार करुन विकत आणली. आज सुदैवाने म्हणावे की दुर्दैवाने ठाऊक नाही, पण तो निर्णय चुकला नाही. दुर्दैवाने यासाठी की गोष्टीस्वरूप लेखन वाचण्याचा, त्यायोगे मेंदूला फार ताण न देण्याचा हेतू असफल झाला. सुदैव अशासाठी एक धाडसी फेरमांडणी वाचण्याचे समाधान हाती लागले. ज्यांना आपण सरसकट इतिहास मानतो अशा पुराणकथांबाबत भारतीय समाजमन दिवसेंदिवस अधिकाधिक उत्कलनशील होत चालले आहे. त्याचवेळी बंदिस्त, प्रवाहकुंठित तळ्यासारखी शेवाळलेली मानसिकता त्याभोवतीचा वेढा अधिकाधिक आवळत चालली आहे. ‘पुराणकथाच नव्हे तर अगदी अर्वाचीन इतिहासाचे तपशीलही राजकीय कारणांसह अनेकविध कारणांनी बदलत जात केवळ भूतकालाधारित दंतकथांच्या पातळीवर उतरतात’ हे मान्य करण्याची तिची तयारी नाही. उलट अनेक काल्...
पुढे वाचा »
RamataramMarquee
‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - १२ : जठराग्नी शमवाया भूतां ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - ११ : अद्यतनीकरण (Update) ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - १० : नव्या व्यवस्थेकडे ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - ९ : सर्वे सुखिन: सन्तु सण गेले विरुनी ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - ८ : धर्म आणि सहजीवन प्लरिबस’च्या निमित्ताने... - ७ : वैय्यक्तिक संपत्ती नि विषमता ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - ६ : समूह नव्हे व्यक्ती; गरज नव्हे संपत्ती
शनिवार, २६ जुलै, २०२५
वेचताना... : लंकेचा संग्राम
शुक्रवार, १८ जुलै, २०२५
सोन्याची लंका, रामराज्य आणि समाज
-
रावणाने डोळ्यांवर हात ठेवत सूर्याकडे नजर केली. आणि तो हसला. ‘काय झालं हसायला?’ कुंभकर्णाने विचारलं.. रावण आणि कुंभकर्ण सीतेच्या कुटीबाहेरच्या पडवीत उभे होते. तिची वाट बघत. त्यांनी नुकतीच न्याहारी केली होती. न्याहारी करून झाल्यावर पूजेसाठी सीता पुन्हा आता कुटीत गेली होती.. ‘असंच... दुःखात बुडालेला सूर्य पाहतोय,’ रावण उत्तरला. कुंभकर्ण खट्याळ हसत म्हणाला. ‘मला कळत नाही दादा, की कुठला तू जास्त त्रासदायक आहेस माझ्यासाठी. पूर्वीचा तू, जो माझं कधीच ऐकायचा नाही की आताच हा नवीन तत्त्वज्ञानी तू, जो कोड्यात बोलतो !’. रावण कुंभकर्णाच्या पोटात एक गुद्दा देत म्हणाला.‘अरे हलकट कुत्र्या!’ कुंभकर्ण रावणाला घट्ट मिठी मारत आणखी मोठ्याने हसू लागला. डोळ्यांतून पाणी येईपर्यंत एकमेकांना घट्ट मिठी मारत ते दोघे हसत राहिले. आणि मग त्यांच्या डोळ्यांतून त्यानंतर सुद्धा अश्रू वाहत राहिले. ते अश्रू दुःखाचे होते. वाया गेलेल्या, सरलेल्या वर्षांबद्दलचं दुःख. तेवढ्यात कुणीतरी घसा खाकरला. मग ते दोघे थांबले. त्यांच्यापासून थोड्या अंतरावरच सीता ही गंमत पाहत उ...
पुढे वाचा »
Labels:
अन्योक्ती वाडेकर,
अमीश त्रिपाठी,
पुस्तक,
लंकेचा संग्राम
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
