-
अन्न-वस्त्र-निवारा या मूलभूत गरजा भागवण्यासाठी आवश्यक असणार्या कौशल्यांनंतर माणसाने सर्वप्रथम विकसित केलेले कौशल्य असावे ते गाण्याचे. मनोरंजनाचे दालन माणसाने सर्वप्रथम खुले केले ते गाण्याचे दार उघडूनच. एखादे आवडते गाणे, आवडती धून गुणगुणला नाही असा माणूस सापडणे दुर्मिळ. अगदी आपला आवाज बेसूर आहे हे पक्के ठाऊक असलेली आमच्यासारखी माणसे निदान बाथरुममध्ये – जिथे समोर कुणी नसल्याने भिडस्तपणा आड येत नाही – तरी अधेमधे आपला गळा तासून पाहतात. एक-दोन आठवड्यापूर्वी मुकेशने गायलेले ‘जाने कहाँ गये वो दिन’च्या ताना मारून पाहात होतो. हे गाणे भलतेच दगाबाज आहे, निदान माझ्यासाठी तरी. ‘जाने कहाँ ग_’ नंतरचा जो उठाव– की तान की मींड की काहीतरी– आहे तो मला नेहमीच दगा देऊन जातो. म्हणजे असं की गातो खरा, पण पुढची ओळ… पुढे वाचा »
RamataramMarquee
निवडणुका, प्रातिनिधित्व: अमेरिका आणि भारत       ट्रम्प, अमेरिका आणि जागतिक बदलाचे वारे - २ : ट्रम्प आणि इस्रायल       ट्रम्प, अमेरिका आणि जागतिक बदलाचे वारे - १       अर्ध्यावरती डाव मोडला...       वारसा, जिज्ञासा आणि ज्ञान - २ : पण याचा उपयोग काय?       पौरुषाचा कांगावा      वारसा, जिज्ञासा आणि ज्ञान - १. वृद्धत्वाची जेथ प्रचिती...       काव्य-मोतीचूर ऊर्फ काही ‘चविष्ट’ प्रेमकविता      
Indexes Menu_Desktop
| संपूर्ण सूची : |
शुक्रवार, २५ ऑगस्ट, २०१७
वेचताना... : कट्यार काळजात घुसली
सोमवार, २१ ऑगस्ट, २०१७
एक घायाळ द्रोणाचार्य
-
सदाशिव: माझी शेवटची इच्छा! ठीक आहे. सांगतो. तुम्ही ज्या आसनावर बसून गात होतात, त्याच आसनावर बसून मला गायचं आहे. एकदा. या हवेलीत नोकर म्हणून वावरताना अनेकदा तुमचा रियाज ऐकला. पण कधी खुल्या आवाजात मोकळ्या मनानं ते गाऊ शकलो नाही. मनाच्या गाभार्यात घुमणारे ते मुके सूर मुखातून बाहेर पडायला उतावीळ झाले आहेत. खाँसाहेब, आपण समोर बसून माझं गाणं ऐका- तुम्हाला ते आवडलं तर उराशी जपलेलं माझं स्वप्न अंशतः तरी खरं होईल, मी कृतकृत्य होऊन आनंदानं तयार होईन ती कट्यार काळजात झेलून घ्यायला– उस्तादः और अगर नहीं जँचा तो? नही पसंद आया तो? सदाशिव: आपणासारख्या अधिकारी व्यक्तीला माझं गाणं आवडलं नाही तर ‘कट्यारीशिवाय’ मरेन मी! कारण जिवंत राहण्याचं काही प्रयोजनच उरणार नाही! उस्तादः माषाल्ला! क्या मिजाज़ पाया है लौंडेने! आखरी दम तर मुजोरी और सीना जोरी! बै… पुढे वाचा »
Labels:
कट्यार काळजात घुसली,
नाटक,
पुरुषोत्तम दारव्हेकर,
पुस्तक
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)
