-
चढणीवर आणखी एका अप-टु-डेट माणसाची पावलं पडलेली पाहताच मळकर्णीचा डोंगर स्वत:शीच पुटपुटला, ’सटवाईनं नशिबी लिहिलेलं कधी चुकायचं नाही !’ ... आता आजच्या विज्ञानयुगात ’सटवाईनं नशिबी लिहिण्याची’ भाषा शोभून दिसत नाही, हे खरं, तरी पण मळकर्णीचा डोंगर चार बुकं देखील न शिकलेला नांगरगट्ट्या डोंगर, घडणार्या घडामोडींचा अधिक काय अर्थ लावू शकणार होता? पण झालं होतं, ते असं... फार फार वर्षांपूर्वी ज्वालामुखीचा उद्रेक होऊन त्यातून सांडलेल्या लाव्हाने एक डोंगरी कुटुंब तयार झालं होतं. माणसं त्याला सह्यगिरीची रांग वगैरे म्हणतात. शेकडो वर्षे त्या कुटुंबातील डोंगर सुखासमाधानाने नांदले. कुणी लंब्याटंगाळ्या आहे म्हणून, तर कुणी बुट्ट्या थोटा आहे म्हणून परस्परांचा द्वेष, मत्सर त्यांनी कधी केला नाही. त्यांचे आपले एक … पुढे वाचा »
RamataramMarquee
गुरुवार, ७ मार्च, २०१९
मळकर्णीचा डोंगूर...
Labels:
अनिल बर्वे,
कादंबरी,
डोंगर म्हातारा झाला,
पुस्तक,
वेचित
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)