RamataramMarquee

सूची: अनुक्रमे ▶ वेचे ▶ वेचताना ▶ दृक-श्राव्य ▶

रविवार, ९ नोव्हेंबर, २०२५

Seeing is believing


  • माझी अभिव्यक्ती ही शब्दांच्या आधारे ‘दृश्यमान’ होत असते. पण सध्या व्हिडिओ या माध्यमाची चलती आहे. त्यामुळे एक-दोन मित्र मला पॉडकास्ट (खरंतर हा शब्द चुकीचा आहे. पण तो आता रुळला आहे.) सुरु करण्याचा सल्ला देत असतात. ‘त्यामुळे तुझे लेखन(?) अधिक लोकांपर्यंत पोहोचेल’ अशी सायबर-मार्केटिंग स्ट्रॅटेजी ते मला कळकळीने सांगत असतात. पण मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेंद्र कुमारांप्रमाणे मीही ‘आता माझ्या विचारांतील कल्पना, समीक्षा, भाषिणी, संज्ञा यांना असे चारचौघात मिरवावे का?’ असा प्रश्न विचारुन त्यांना पडदानशीनच ठेवत असतो. गोळाबेरीज ही की सध्या व्हिडिओ या माध्यमाचा बोलबाला आहे. तो तसा नव्हता तेव्हापासून, बहुसंख्या - विशेषत: समाजमाध्यमांवरची - ही ‘समोर येईल तेच वाचतो’ असे बाणेदार उत्तर देऊन ‘ब्लॉग वगैरे आउटडेटेड गोष्टी कोण वाचणार’ अशा आविर्भावात मला झाडून टाकत असत. आता रील्सच्या जमान्यात समोर येईल तेच ‘पाहातो’ अशी प्रगती झाली आहे. मीही अधूनमधून त्या प्रवाहात अडकत असतो हे मान्य करण्यास प्रत्यवाय नाही. “काळे, एवढं समजतं आहे तर मग करा ना व्हिडिओ; पाहू आम्ही” असा सल्ला मिळणे ओघाने आलेच. पण आमची अभिव्यक्...

    पुढे वाचा »