RamataramMarquee

Indexes Menu_Desktop

संपूर्ण सूची :

सोमवार, ६ नोव्हेंबर, २०२३

मूल्य


  • आता अंधारू लागले होते, पण खरी रात्र पडली नव्हती. कोठे काही तरी खावे असे तीव्रपणे वाटण्याइतकी भूक त्याला अद्याप लागली नव्हती. तेव्हा आणखी थोडा वेळ कोठे घालवावा याचा त्याला विचार पडला. पण मद्यागारांच्या बाजूलाच सुर्‍या-कट्यारींचे एक दुकान पाहताच त्याला बरे वाटले. तो सहजपणे तिथे गेला व बाहेर रुंद, मोठ्या खिडकीत टांगलेल्या कट्यारींकडे पाहू लागला. “तुला कट्यार हवी का ? मग आत ये. आत पुष्कळ नमुने आहेत.” कोणीतरी त्याला जाड भरदार स्वरात म्हणाले. दारात एक धिप्पाड माणूस उभा होता. त्याने उघड्या अंगावर अरुंद पाळ्यांचे नुसते एक कातडी जाकीट अडकवल्याने त्यांची रुंद केसाळ छाती पूर्णपणे उघडी होती व तिच्यावर पावशेराएवढा अजस्र ताईत होता. “छे, खरे म्हणजे मला काहीच विकत घ्यायचे नाही.” तो किंचित विरमून म्हणाला. “ मी पुष्कळ भटकलो आहे. प्रत्येक देशाचे अन्न निर… पुढे वाचा »