-
त्या रात्री बुधा एकदम जागा झाला. त्यानं चिमणी लावलीच नव्हती. बकर्यांचे श्वास त्याला ऐकू येत होते. पण त्याला असं वाटलं, की कुणी तरी दाराशी येऊन उभं राहिलं आहे. तो कसाबसा धडपडत अंथरुणावर उठून बसला. कण्हत कण्हत, खोल स्वरात त्यानं विचारलं, "कोन हाय त्ये?" पण उत्तर आलं नाही. कारण कुणीच आलं नव्हतं. बुधाला आपलं उगीचच वाटलं होतं. मग तो पुन्हा अंथरुणावर पडला. बाहेर पावसाच्या सरीवर सरी कोसळत होत्या. कड्यावरून पाणी खाली झेपावत होतं. त्याचा केवढा तरी आवाज होत होता. बुधाला एकदम वाटलं की उठावं, अन् आपल्या कुत्र्याची समाधी जागेवर आहे किंवा नाही ते पाहून यावं. आपल्या आवळीबाईला भेटून यावं. त्यानं उठायची धडपड केली. पण त्याला असं जाणवलं की सगळ्या इंद्रियांच्या शक्ती शरीराला सोडून चालल्या… पुढे वाचा »
RamataramMarquee
अर्ध्यावरती डाव मोडला...       वारसा, जिज्ञासा आणि ज्ञान - २ : पण याचा उपयोग काय?       पौरुषाचा कांगावा      वारसा, जिज्ञासा आणि ज्ञान - १. वृद्धत्वाची जेथ प्रचिती...       काव्य-मोतीचूर ऊर्फ काही ‘चविष्ट’ प्रेमकविता       चला दोस्तहो, खाण्यावरती बोलू काही       मूषकान्योक्ती       सुजन गवसला जो      
Indexes Menu_Desktop
| संपूर्ण सूची : |
मंगळवार, १७ एप्रिल, २०१८
सोयरे वनचरी
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)
