-
भक्ती असा शब्द आला की तिच्यासोबत कर्मकांडे आणि अवडंबर ओघाने येतेच. मग ती देवभक्ती असो, राष्ट्रभक्ती असो की व्यक्तिभक्ती. भक्तीला, श्रद्धेला निखळ स्वरूपात न ठेवता त्यावर शेंदराची पुटे चढवून तिची विक्रयवस्तू केल्याखेरीज बहुतेक स्वयंघोषित भक्तांना चैन पडत नाही. एकामागून एक अशा चित्रविचित्र कल्पनांचे आणि पूर्वग्रहांचे कपडे तिच्यावर चढवून तिला पाऽर बुजगावण्याचे स्वरूप दिल्यावरच माणसे कृतकृत्य होत असतात. गद्य शब्दांपेक्षा अनेकदा गीत-संगीताने भावनांचा रसपरिपोष अधिक नेमका आणि निखळ होत असतो. देशभक्तिपर भावनांचे कढ तर सोडा, कढी उतू जात असताना अनलंकृत देशभक्तीला मुजरा करणारी ही चार गाणी. यांची निवडही अगदी छातीबडवू स्वयंघोषित देशभक्तांपासून त्या भावनेशी प्रामाणिक असणार्यांपर्यंत सार्यांनाच भावतील अशी केली आहे. पहिले गीत आहे राष्ट्रसेवादलाचे अध्व… पुढे वाचा »
RamataramMarquee
Indexes Menu_Desktop
संपूर्ण सूची : |
रविवार, १५ ऑगस्ट, २०२१
स्वातंत्र्यदिनाची वेचणी : देशासाठी चार गीते
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)