-
पुलं एके ठिकाणी म्हणतात, ’गाणार्याला नुसता गाता गळा असून भागत नाही, आधी एक गातं मन असावं लागतं. ते सदैव हसरं, गातं असावं लागतं. तरच गाणं संभवतं.’ त्याच धर्तीवर खळखळून हसण्यासाठी एक निर्व्याज आणि निर्भेळ मन असावं लागतं असं माझं मत आहे. खळखळून हसणे हा विनामूल्य वापरता येणारा असा तणावहारी उपचार आहे. पंचाईत अशी की असे हास्य आवंतून आणता येत नाही; हास्यक्लबवाले काहीही म्हणोत. पाच-सहा वर्षांची एक मुलगी खळखळून हसताना काढलेले हे छायाचित्र चार-पाच वर्षांपूर्वी कुठेतरी सापडलं नि आमच्या कम्प्युटरच्या हार्ड-डिस्कमध्ये रुतून बसलं. तिच्या चेहर्यावर एक जिंकल्याचा, परिपूर्तीचा आनंद आहे. दोन्ही हात उंचावून तो आनंद ती व्यक्त करताना दिसते आहे. इतका निरभ्र आनंद कित्येक वर्षांत स्वत: अनुभवल्याचं आठवत नाही. आज म… पुढे वाचा »
RamataramMarquee
निवडणुका, प्रातिनिधित्व: अमेरिका आणि भारत       ट्रम्प, अमेरिका आणि जागतिक बदलाचे वारे - २ : ट्रम्प आणि इस्रायल       ट्रम्प, अमेरिका आणि जागतिक बदलाचे वारे - १       अर्ध्यावरती डाव मोडला...       वारसा, जिज्ञासा आणि ज्ञान - २ : पण याचा उपयोग काय?       पौरुषाचा कांगावा      वारसा, जिज्ञासा आणि ज्ञान - १. वृद्धत्वाची जेथ प्रचिती...       काव्य-मोतीचूर ऊर्फ काही ‘चविष्ट’ प्रेमकविता      
Indexes Menu_Desktop
| संपूर्ण सूची : |
शनिवार, १२ मार्च, २०२२
हासून ते पाहाणे
रविवार, ६ मार्च, २०२२
भविष्यवाणी
-
पण माझ्यात तर असामान्य कौशल्य आणि शक्ती नाहीयेत." हॅरी न राहवून बोलून गेला. “आहेत, तुझ्याकडे आहेत," डम्बलडोर ठामपणे म्हणाले. “तुझ्याकडे एक शक्ती अशी आहे, जी वॉल्डेमॉर्टकडे कधीच नव्हती. तू-" “मला माहीत आहे!" हॅरी अधिरेपणाने म्हणाला. "मी प्रेम करू शकतो!” मोठ्या मुष्किलीने तो हे शब्द गिळू शकला की, त्याचा काय उपयोग होणार आहे?' “होय हॅरी, तू प्रेम करू शकतोस." डम्बलडोर म्हणाले. पण त्यांच्याकडे पाहून असं वाटत होतं, की जे काही बोलता बोलता हॅरी थांबला, ते त्यांना चांगलंच माहीत होतं. "तुझ्या बाबतीत जे काही घडलं, त्याचा विचार करता ही एक उल्लेखनीय बाब आहे. हॅरी, तू किती विलक्षण आहेस, हे कळायला तू अजून तू फारच लहान आहेस." हॅरीने थोडंसं निराश होऊन विचारलं, "याचा अर्थ, भविष्यवाणी जेव्हा असं म्हणते… पुढे वाचा »
Labels:
कादंबरी,
जे. के. रोलिंग,
पुस्तक,
हॅ. पॉ. : हाफ-ब्लड प्रिन्स
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)

