-
मी पोहोचतो दुसऱ्या दिवशी, पत्त्यावर. सूरज-व्हिलाचा खालचा मजला सगळा वाढवून त्याचं कॅफेत रूपांतर करण्यात आलंय. उत्पन्नाचं ते साधनही असावं बहुधा. खालचा मजला जुनाच ठेवलाय, फारशी देखभाल नाही. पण वरचा मजला डागडुजी करून रंगवलाय. तिथं ती राहत असावी. कॅफेचा मालक (किंवा व्यवस्थापक) रसिक हौशी आहे. तिथं जुनी गाणी वाजवली जातात. 'ए मेरी जोहराजबीऽ' हे गाणं न चुकता रोज ऐकवलं जातं. 'सिंदूर' मधलं 'तूफान से कश्ती टकराई' आणि 'दिया जलाकेऽ आप बुझाऽया'चे स्वर या कॅफेत गुंजतात रोज. एक लाकडी जिना आहे वर जायचा. त्याला पॉलीश नाही. पण तिथं दरवाजा आहे रंगवलेला. तिथं 'प्लॅटफॉर्म' आहे. ती दोनदा तिथं येऊन उभी राहते आणि कॅफेतल्या सर्वांना 'दर्शन' देते, अजूनही. चाहते (अजूनही) आलेले असतात. त्यांची संख्या कमी आहे, पण ठरलेली आ… पुढे वाचा »
RamataramMarquee
अर्ध्यावरती डाव मोडला...       वारसा, जिज्ञासा आणि ज्ञान - २ : पण याचा उपयोग काय?       पौरुषाचा कांगावा      वारसा, जिज्ञासा आणि ज्ञान - १. वृद्धत्वाची जेथ प्रचिती...       काव्य-मोतीचूर ऊर्फ काही ‘चविष्ट’ प्रेमकविता       चला दोस्तहो, खाण्यावरती बोलू काही       मूषकान्योक्ती       सुजन गवसला जो      
Indexes Menu_Desktop
संपूर्ण सूची : |
बुधवार, २९ जून, २०२२
प्रतीक्षा
मंगळवार, २८ जून, २०२२
सत्तांतर
-
जानेवारी आला. हिवाळा ऐन कडाक्यात चालू झाला. जमीन दगडासारखी कडक झाली व शेतात, बागेत काहीच करता येण्यासारखं नव्हतं. तेव्हा मग मोठ्या कोठारात डुकरांनी बैठका घ्यायला सुरुवात केली. पुढच्या मोसमांत काय काय करायचं याच्या योजना आखल्या जाऊ लागल्या. डुकरांचं बौद्धिक वर्चस्व केव्हाचं मान्य झाल्यामुळे चर्चेची सर्व सूत्रं त्यांच्याच हाती असत. निर्णय त्यांनीच घ्यायचे असत. स्नोबॉल आणि नेपोलियन यांच्यात झगडा नसता तर ही व्यवस्था अशीच चालू रहायला हरकत नव्हती. पण त्याचं कुठल्याही मुद्यावर एकमत होत नसे. स्नोबॉल आपल्या ज्वलंत भाषणांनी सभा जिंकत असे पण मतदानाची वेळ आली की नेपोलियन ती कावेबाजपणे आपल्याकडे वळवण्यात बरेचवेळा यशस्वी होत असे. त्याला या कामी खरी मदत होत होती ती मेंढ्यांची. चार पाय चांगले, दोन पाय वाईट,' हे घोषवाक्य त्यांनी चांगलंच आत्मसात केलं … पुढे वाचा »
Labels:
अनुवाद,
अॅनिमल फार्म,
कादंबरी,
जॉर्ज ऑरवेल,
पुस्तक
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)