-
“थोड्या वेळाने टोपलीवरील झाकण उघडले. तो क्षण दिव्य होता. ज्या क्षणी स्वप्न सत्य म्हणून जन्माला येते, आणि लालसेचा उगम म्हणजेच तृप्ती ठरते असा दुर्लभ क्षण ! मी पाहिलेली स्त्री शय्येवर राजवस्त्रांत होती. आणि तिच्या शरीरावर तर आता रत्नप्रकाशाचा उत्सव होता. आता तिने नागमुकुट कपाळावर ठेवला होता. तिच्या डोळ्यांत मात्र अथांग विषण्णता होती. पण तिचा गोरापान गळा व त्याच्याखालील रत्नमाला शोभणारा थोडा प्रदेश पूर्वीइतकाच उन्मादक, खुणावणारा होता. गळ्याशी धरून तिने मला धीटपणे उचलले, व आपल्या उरावर धरत मृदू शब्दांत म्हटले, ‘ये, आता तूच माझा सखा आहेस. एक देदिप्यमान साम्राज्य मावळत असता तूच त्याला आता निरोप दे.’ “त्यावर आयुष्यभर जपलेल्या वासनेने मी त्या गौर अंगावर दंश केला व पुन्हा पुन्हा दंश केले. त्या त्या ठिकाणी निळसर वर्तुळे पसरली, आणि अखेर शय्येवर पस… पुढे वाचा »
RamataramMarquee
अर्ध्यावरती डाव मोडला...       वारसा, जिज्ञासा आणि ज्ञान - २ : पण याचा उपयोग काय?       पौरुषाचा कांगावा      वारसा, जिज्ञासा आणि ज्ञान - १. वृद्धत्वाची जेथ प्रचिती...       काव्य-मोतीचूर ऊर्फ काही ‘चविष्ट’ प्रेमकविता       चला दोस्तहो, खाण्यावरती बोलू काही       मूषकान्योक्ती       सुजन गवसला जो      
Indexes Menu_Desktop
| संपूर्ण सूची : |
रविवार, १८ फेब्रुवारी, २०२४
स्वप्न-वास्तव-सत्ता
गुरुवार, १ फेब्रुवारी, २०२४
साहित्याचे भवितव्य
-
नुकताच एका युवकाने (हा शब्द अलीकडे आला. मागे ‘पोरसवदा’ म्हणत.) मला प्रश्न विचारला, “लेखक व्हावं, असं मला फार वाटतं. मी प्रथम काय करू?” मी गंभीरपणे म्हणालो, “फेरविचार.” “म्हणजे?” “लेखन करून त्यावरच आपला चरितार्थ चालवावा, अशी तुमची जर योजना असेल; तर हा निर्णय घेण्याअगोदर तुम्ही फेरविचार करावात, हे बरं, कारण मला तरी इथून पुढे साहित्याचं भवितव्य फारसं उज्ज्वल दिसत नाही. मी हे अगदी मनापासून बोलतो; काही तरी चमकदार बोलावं म्हणून नाही.” ‘आम्हां घरी धन, शब्दांचे भांडार’ किंवा ‘हे शब्द-सृष्टीचे ईश्वर,’ हा शब्दाचा महिमा जाऊन आता देखाव्याला महत्त्व प्राप्त होत आहे. दृष्टीची मागणी आधी पुरी करावी, ही बालवाडीत उपयोगात आणावयाची पद्धत आता सर्वत्र लागू होत आहे. रंगीबेरंगी चित्रपट, रंगीबेरंगी नाटके, लोकनाट… पुढे वाचा »
Labels:
अनुभव,
पांढर्यावर काळे,
पुस्तक,
व्यंकटेश माडगूळकर
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)

