-
“तुला जर माझ्या मुक्याचा इतका तिटकारा वाटत असेल तर परत नाही हो घेणार ! दुसरी एखादी असती तर तुझ्याशी बोललीसुद्धा नसती. पण मला तुझ्या न् तुझ्या नवऱ्याबद्दल माया वाटते ना!” म्हातारी का संतापली मला समजेच ना. माझे लग्न व्हायच्या आधी माझा नवरा जर्मनीत असताना त्याने जोडलेल्या माणसांपैकी ती होती. तो तिला ‘आजी’ म्हणे, तिने त्याला जर्मन शिकविले. त्याला परदेशात तिचे घर म्हणजे एक आसराच होता. पुढे मी जर्मनीत गेल्यावर त्याची बायको म्हणून तिने एखाद्या आप्ताप्रमाणे माझे स्वागत केले. चार ठिकाणी हिंडून चांगल्या कुटुंबात मला बिर्हाड बघून दिले. बर्लिनच्या विश्वविद्यालयातील दोन-चार अध्यापकांना भेटून माझे नाव नोंदविले. मी जरी कितीही कामात असले तरी पंधरा दिवसांतून एका शनिवारी संध्याकाळी तिच्याकडे जावयाचे व जेवून प… पुढे वाचा »
RamataramMarquee
वारसा, जिज्ञासा आणि ज्ञान - १. वृद्धत्वाची जेथ प्रचिती... काव्य-मोतीचूर ऊर्फ काही ‘चविष्ट’ प्रेमकविता       चला दोस्तहो, खाण्यावरती बोलू काही       मूषकान्योक्ती       सुजन गवसला जो       क्रिकेटमधील उपेक्षितास दाद       बाबेलचा दुसरा मनोरा       Will He...?       To Dumbo, with Love       पहलगाम आणि आपण      
Indexes Menu_Desktop
संपूर्ण सूची : |
सोमवार, २४ फेब्रुवारी, २०२५
चुंबन-चिकित्सा
सोमवार, १० फेब्रुवारी, २०२५
पाखरा जा, त्यजुनिया...
-
प्रास्ताविक: रमतारामाच्या विश्रांतीस्थळी काल ‘परतुनि ये घरा...’ मालिकेतील एक भाग प्रसिद्ध केला. त्यात मोहन राकेश यांच्या ‘आषाढ का एक दिन’ मधील कालिदासाच्या परतून येण्याच्या प्रसंगाच्या आधारे आकलन मांडले आहे. सुदैवाने या नाटकाचा मराठी अनुवाद माझ्याकडे आहे. त्यातून कालिदासाने मल्लिकेचा निरोप घेऊन कीर्ति-संपदेच्या वाटे चालू लागण्याचा आणि सारे भौतिक यश गमावून परतून येण्याचा असे दोन प्रसंग निवडून इथे देतो आहे. ‘परतुनि ये घरा...’ मध्ये केवळ त्या संगतीच्या संदर्भामध्ये कालिदासाचे मूल्यमापन तेवढे आले आहे. एकुण नाटकाबाबतचे, या वेच्यांबाबतचे विश्लेषण स्वतंत्रपणे ‘वेचताना...’ मालिकेमध्ये लवकरच मांडेन. --- (अंबिका डोळे मिटून काही क्षण स्थिर उभी. मग उदासपणे सर्वत्र पाहाते व खचून गेल्यासारखी पाटावर बसते. थाळ्यातील तांदूळ चोळता चोळता डोळे भरून येतात.… पुढे वाचा »
Labels:
आषाढातील एक दिवस,
नाटक,
पुस्तक,
मोहन राकेश,
विश्वनाथ राजपाठक
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)