-
“आपल्या आजच्या व्याख्यात्या श्री...... ह्यांच्या कन्या आहेत—” माझी ओळख करून देणाऱ्या बाईंच्या बोलण्याला सुरुवात झाली. त्यांचे बोलणे मी अर्धवट ऐकत होते; पण मन मात्र बाईच्या बोलण्याने जाग्या झालेल्या स्मृती आणि कल्पना ह्यांत गुंतले होते. “एकदा लग्न उरकून टाकले म्हणजे जबाबदारी सुटली” असे बाबांचे बोलणे मॅट्रिकच्या वर्गात असल्यापासून ऐकले होते. माझा पुढे शिकण्याचा हट्ट, बाबांचा त्रागा, शेवटी “कर, काय वाटेल ते कर” ह्या शब्दांनी मोठ्या कष्टाने दिलेली परवानगी हे आठवले; व तीच भाषा, तेच भांडण आणि तोच शेवट दरवर्षी परीक्षेच्या शेवटी कसा व्हायचा हे आठवून क्षणभर हसू आले. ते रागात आले म्हणजे अस्सल प्राकृतात पाचपन्नास शिव्या हासडून बोलत. आम्ही जरा मोठी झाल्यावर तर रोज ह्या-नाही-त्या गोष्टीवरून वादविवाद व शेवटी भांडण ठरलेलेच होते. ते जितके तापट तितकी आई शांत. त्यांनी म्हणावे, “ह्या पोरांच्या तोंडास तोंड देण्यानं टेकीस आलो,” तिने म्हणावे, “सगळी तुमच्या वळणावर गेली आहेत,” की त्यांनी चूप बसावे. त्यांचे प्रेमातले भाषण म्हणजे असेच. मुलींना ते ‘म्हैस’ म्हणत व...
पुढे वाचा »
RamataramMarquee
‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - १२ : जठराग्नी शमवाया भूतां ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - ११ : अद्यतनीकरण (Update) ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - १० : नव्या व्यवस्थेकडे ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - ९ : सर्वे सुखिन: सन्तु सण गेले विरुनी ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - ८ : धर्म आणि सहजीवन प्लरिबस’च्या निमित्ताने... - ७ : वैय्यक्तिक संपत्ती नि विषमता ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - ६ : समूह नव्हे व्यक्ती; गरज नव्हे संपत्ती
परिपूर्ती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
परिपूर्ती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
मंगळवार, २२ एप्रिल, २०२५
परिचय
सोमवार, २४ फेब्रुवारी, २०२५
चुंबन-चिकित्सा
-
“तुला जर माझ्या मुक्याचा इतका तिटकारा वाटत असेल तर परत नाही हो घेणार ! दुसरी एखादी असती तर तुझ्याशी बोललीसुद्धा नसती. पण मला तुझ्या न् तुझ्या नवऱ्याबद्दल माया वाटते ना!” म्हातारी का संतापली मला समजेच ना. माझे लग्न व्हायच्या आधी माझा नवरा जर्मनीत असताना त्याने जोडलेल्या माणसांपैकी ती होती. तो तिला ‘आजी’ म्हणे, तिने त्याला जर्मन शिकविले. त्याला परदेशात तिचे घर म्हणजे एक आसराच होता. पुढे मी जर्मनीत गेल्यावर त्याची बायको म्हणून तिने एखाद्या आप्ताप्रमाणे माझे स्वागत केले. चार ठिकाणी हिंडून चांगल्या कुटुंबात मला बिर्हाड बघून दिले. बर्लिनच्या विश्वविद्यालयातील दोन-चार अध्यापकांना भेटून माझे नाव नोंदविले. मी जरी कितीही कामात असले तरी पंधरा दिवसांतून एका शनिवारी संध्याकाळी तिच्याकडे जावयाचे व जेवून परत यावयाचे किंवा तिच्याकडेच राहावयाचे असा माझा क्रम असे. आजही मी नेहमीप्रमाणे घंटा वाजवल्यावर तिने दार उघडून मोठया प्रेमाने माझे स्वागत केले व नंतर संतापाने ती वरील वाक्य बोलली. म्हातारी म्हणजे एक लहानशीशी, नाजुक नाजुक, बाहुलीच होती जणू. तिचे पांढरे...
पुढे वाचा »
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
