-
जी. ए. कुलकर्णी यांनी USIS साठी (आता American Library) कॉनरॅड रिक्टर या अमेरिकन लेखकाच्या पाच पुस्तकांचा अनुवाद केला होता. त्यांच्या नेहमीच्या पॉप्युलर प्रकाशनाऐवजी ‘परचुरे प्रकाशन मन्दिर’ कडून ही पुस्तके प्रकाशित झाली होती. रान (The Trees), शिवार (The Fields) व गाव (The Town) या तीन कादंबर्या मिळून एका कुटुंबाची, पर्यायाने एका वस्तीच्या स्थापना-विकासाची कथा सांगतात. ही The Awakening Land trilogy म्हणून ओळखली जाते. हे अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या उदयकालावरचे रूपकच आहे. या खेरीज ‘स्वातंत्र्य आले घरा’ (The Free Man) आणि ‘रानातील प्रकाश’ (The Light in the Forest) या दोन छोटेखानी कादंबरिकाही या संक्रमणकाळाच्याच कहाण्या सांगतात. या पांचातील सर्वात अदखलपात्र– होय, अ-दखलपात्र – पुस्तक आहे ते ‘स्वातंत्र्य आले घरा’ ही कादंबरिका. मूळ कथानक अ… पुढे वाचा »
RamataramMarquee
वारसा, जिज्ञासा आणि ज्ञान - १. वृद्धत्वाची जेथ प्रचिती... काव्य-मोतीचूर ऊर्फ काही ‘चविष्ट’ प्रेमकविता       चला दोस्तहो, खाण्यावरती बोलू काही       मूषकान्योक्ती       सुजन गवसला जो       क्रिकेटमधील उपेक्षितास दाद       बाबेलचा दुसरा मनोरा       Will He...?       To Dumbo, with Love       पहलगाम आणि आपण      
Indexes Menu_Desktop
संपूर्ण सूची : |
गुरुवार, २७ मार्च, २०२५
वेचताना... : उठाव
उठाव
-
ते थोडे चालले असतील नसतील, तोच त्यांच्या मागे जलद पावलांचा आवाज ऐकू आला. हेन्नरने मागे वळून पाहिले. चांदण्यांच्या प्रकाशात एका स्त्रीची आकृती आपल्याकडेच वेगाने येत असलेली हेन्नरला दिसली. तिने लांब झगा घालून डोक्यावरून झाकून घेतले होते. तिला एकटीलाच पाहून त्याला फार आश्चर्य वाटले. “मला भेटायचं आहे तुम्हाला, लेफ्टनंट,” तिने हलक्या आवाजात म्हटले, पण यूनीला पाहताच ती थबकली. “सार्जंट, तू छावणीत जा परत.” हेन्नरने यूनीला पाठवून दिले. मान हलवीत यूनी चालू लागला. “हल्ली ससेच उलट कुत्र्यांच्या मागे लागू लागले आहेत ! दिवसच बदलून गेले अगदी!” जाता जाता त्याने बोलभाषेत काढलेले उद्गार हेन्नरच्या कानांवर पडले. “मला ते सांगितल्यावाचून राहवेना, लेफ्टनंट,” यूनी गेल्यावर ती म्हणाली, “जर तुम्ही ब्रिटिशांविरुद्… पुढे वाचा »
Labels:
कादंबरी,
कॉनराड रिक्टर,
जी. ए. कुलकर्णी,
पुस्तक,
स्वातंत्र्य आले घरा
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)