RamataramMarquee

सोमवार, १९ सप्टेंबर, २०१६

वेचताना... : परिव्राजक


  • गौतमीपुत्र कांबळे या लेखकाचे 'परिव्राजक' हे पुस्तक मला सुमारे दहा एक वर्षांपूर्वी मिळाले नि जीएप्रेमी असलेला मी त्याच्या प्रेमात पडलो.  जीएंच्या पाउलखुणा जरी त्या लेखनात दिसत असल्या तरी त्यांनी घेतलेल्या वेगळ्या पार्श्वभूमीमुळे, जीएंप्रमाणेच त्यांच्या स्वतंत्र अशा भूमिकेमुळे, दृष्टिकोनामुळे यातील पाचही कथा वारंवार वाचत गेलो. वास्तवाचे नि कल्पिताचे सांधे जोडणार्‍या जीएंच्या दृष्टान्त कथांना वाट पुसतु जात असल्या, तरी सर्वच कथा वेगवेगळ्या असूनही एक सूत्र घेऊन येतात. निव्वळ विचारांबरोबरच तत्त्वज्ञानाचेही अधिष्ठान घेऊन उभ्या राहतात.  जीए आणि कांबळे यांच्यात एक फरक मात्र दिसतो तो म्हणजे कांबळे यांच्या कथा एका निश्चित निरासावर पोचतात, जो बहुधा आशावादी आहे. अर्थात केवळ शेवट आशावादी असणे ह… पुढे वाचा »

राजपुत्र


  • ... अनीशाने थोड्या वेळाने डोळे उघडले तर समोरच ती भव्य मूर्ती आणि बाजूलाच शांत बसलेला नैसर. अनीशाच्या मनात एक प्रचंड खळबळ निर्माण झाली आणि ती म्हणाली, 'एक विचारू?' 'विचार.' असे प्रत्युत्तर करून नैसर पुन्हा शांत. अनीशाही शांतच. बराच वेळ झाला तरी अनीशा काहीच बोलत नाही असे पाहून नैसर उगीचच अस्वस्थ झाला. आणि तरीही तो इतकंच शांतपणे पुन्हा म्हणाला, 'विचार, काहीही विचार.' मग अनीशाने सगळी ताकद एकवटली आणि बोलायला सुरुवात केली. "... या मूर्तीतील माणसाविषयी ... पूर्ण माणसाविषयी तू आता जी कथा सांगितलीस ती खोटी असली पाहिजे. म्हणजे असे बघ, त्याने आपले राज्यही सोडून दिले तेव्हा जर तो तरुण होता तर त्याचे माता-पिता म्हातारेच असणार की! मग त्याच दिवशी त्याने प्रथम एक म्हात… पुढे वाचा »

रविवार, ११ सप्टेंबर, २०१६

जबाब


  • पी. वाय. : ... कुळकर्णी, ह्याचा जबाब मात्र तुम्हाला द्यावा लागेल. बरीवाईट कशीही का होईना, एक इमारत आम्ही बांधत आणली आहे. तिला सुरुंग लावायला काही माणसं पेटून उठली आहेत. त्यांच्या बाजूला तुम्ही आहात का ह्याचा जबाब तुम्हाला देणं भाग आहे. खरा प्रश्न तो आहे. विचार करून उत्तरे द्या. या सगळ्या प्रकरणात आम्ही कुठं उभं राहायचं ते तुमच्या उत्तरावर अवलंबून आहे. तो : फार अवघड प्रश्न विचारलात पी. वाय. तुमची सगळी चौकशी याच दिशेने चालली आहे हे माझ्या कधीच लक्षात आलं होतं. पण पी. वाय., या प्रश्नाचं मी काय उत्तर देणार? मी मघाच तुम्हाला सांगितलं की आंधळ्या वायलन्सचा मी पुरस्कर्ता नाही. ते ही अर्धसत्य आहे. खरी गोष्ट अशी आहे की वायलन्सची मला भीतीच वाटते. मी रक्त अजून जवळून पाहिलेलंसुद्धा नाही... माणसाचं रक्त...… पुढे वाचा »