RamataramMarquee

Indexes Menu_Desktop

संपूर्ण सूची :
उद्ध्वस्त धर्मशाळा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
उद्ध्वस्त धर्मशाळा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, ११ सप्टेंबर, २०१६

जबाब


  • पी. वाय. : ... कुळकर्णी, ह्याचा जबाब मात्र तुम्हाला द्यावा लागेल. बरीवाईट कशीही का होईना, एक इमारत आम्ही बांधत आणली आहे. तिला सुरुंग लावायला काही माणसं पेटून उठली आहेत. त्यांच्या बाजूला तुम्ही आहात का ह्याचा जबाब तुम्हाला देणं भाग आहे. खरा प्रश्न तो आहे. विचार करून उत्तरे द्या. या सगळ्या प्रकरणात आम्ही कुठं उभं राहायचं ते तुमच्या उत्तरावर अवलंबून आहे. तो : फार अवघड प्रश्न विचारलात पी. वाय. तुमची सगळी चौकशी याच दिशेने चालली आहे हे माझ्या कधीच लक्षात आलं होतं. पण पी. वाय., या प्रश्नाचं मी काय उत्तर देणार? मी मघाच तुम्हाला सांगितलं की आंधळ्या वायलन्सचा मी पुरस्कर्ता नाही. ते ही अर्धसत्य आहे. खरी गोष्ट अशी आहे की वायलन्सची मला भीतीच वाटते. मी रक्त अजून जवळून पाहिलेलंसुद्धा नाही... माणसाचं रक्त...… पुढे वाचा »

शुक्रवार, १ जुलै, २०१६

पराभूत थोरवीच्या शोधात


  • ( प्रस्तावनेतून.. .) आपल्या सामाजिक, राजकीय किंवा सांस्कृतिक नेतृत्वाचा विचार करू जाता एक गोष्ट ठळकपणे जाणवते. या सगळ्या क्षेत्रात नेतृत्व फार लहान माणसांकडे आहे. त्यात पर्वतप्राय महत्तेचा माणूस कुणी दिसत नाही. आहेत त्या लहानलहान टेकड्या. त्यात पुन्हा घोटाळा असा आहे की, ह्या टेकड्यांनाही आपण हिमालय असल्याची स्वप्ने पडताना दिसतात. जुन्या काळातील डिस्ट्रिक्ट लोकल बोर्ड पद्धतीचे राजकारण मोठ्या प्रमाणावर खेळणार्‍या धुरंधरांना आपण स्वतः लोकमान्य आहोत असे वाटत असावे! पाचपन्नास गीते लिहिणार्‍यांना स्वतःला महाकवी म्हणून घेणे आवडते. चारसहा शब्द जुळवणार्‍यांना ज्ञानदेवांसारखे आपले कवित्व आहे असे वाटते. दोन संवाद लिहिणार्‍यांना आपण शेक्सपीयर किंवा बेकेट (रुचिप्रमाणे) आहोत असा सुखद भास होत असावा. एखाददुसर्‍या जिल्ह्यात थोडी संघटना बांधणार्‍यांना ह्य… पुढे वाचा »