RamataramMarquee

शुक्रवार, १९ ऑक्टोबर, २०१८

बळी


  • "वासंती मेली." बाळ्यानं पहिल्यांदाच फटकन सांगितलं. नान्याचा चेहरा कोवळाकोवळा होऊन गेला. "पुढं ऐक. आम्हाला कुणालाच माहीत नाही ती आजारी आहे हे. चाळीतली माणसं पहिल्यांदा थोडी बुचकळ्यात पडली. हिचं झालं काय? ही येत का नाही? ही माणसं भलतंच काही समजली. कुजबूज सुरू. हे चाळीचं म्हणजे एकदम ठेवणीतलं. सांगतो काय. या लोकांना अकलाच नाहीत..." मधेच सुधा दारापाशी गेली. तिनं दाराला कड्या आहेत की नाही हे पाहिलं. "हळू बोला. आपल्याला राहायचंय इथं-" खालच्या मानेनं सांगून ती कपाटाआड वावरु लागली. "उठवलं कुणीतरी- वास्याला दिवस गेलेत. पाहायला मात्र पहिल्यांदा कुणीच गेले नाहीत हं. वार्ता चाळभर. या चाळीतून वार्ता त्या चाळीत प्लेगच्या उंदरासारखी पडली. मग काय, त्या चाळीतदेखील तेच. आमच… पुढे वाचा »

मंगळवार, १७ एप्रिल, २०१८

सोयरे वनचरी


  • त्या रात्री बुधा एकदम जागा झाला. त्यानं चिमणी लावलीच नव्हती. बकर्‍यांचे श्वास त्याला ऐकू येत होते. पण त्याला असं वाटलं, की कुणी तरी दाराशी येऊन उभं राहिलं आहे. तो कसाबसा धडपडत अंथरुणावर उठून बसला. कण्हत कण्हत, खोल स्वरात त्यानं विचारलं, "कोन हाय त्ये?" पण उत्तर आलं नाही. कारण कुणीच आलं नव्हतं. बुधाला आपलं उगीचच वाटलं होतं. मग तो पुन्हा अंथरुणावर पडला. बाहेर पावसाच्या सरीवर सरी कोसळत होत्या. कड्यावरून पाणी खाली झेपावत होतं. त्याचा केवढा तरी आवाज होत होता. बुधाला एकदम वाटलं की उठावं, अन्‌ आपल्या कुत्र्याची समाधी जागेवर आहे किंवा नाही ते पाहून यावं. आपल्या आवळीबाईला भेटून यावं. त्यानं उठायची धडपड केली. पण त्याला असं जाणवलं की सगळ्या इंद्रियांच्या शक्ती शरीराला सोडून चालल्या… पुढे वाचा »