RamataramMarquee

शुक्रवार, २९ मे, २०२०

जीवनाचे पोर्ट्रेट


  • गंभीर चेहर्‍याच्या आणि कधीही न हसणार्‍या, मोजके बोलणार्‍या आणि चार चौघांपासून फटकून राहात आपले वेगळेपण जपणार्‍या माणसालाच जगण्याबद्दलचा गंभीर विचार करणे शक्य होते असा एक समज उगाचच आपल्या समाजात पसरलेला दिसतो. नाटकवाली मंडळी ही चित्रपटाला नि त्या संबंधित मंडळींपेक्षा स्वत:ला काकणभर (कदाचित हातभरही असेल) उंच समजतात, तर चित्रपटातून बाद झालेले अभिनेते/अभिनेत्रीच फक्त सीरियलमध्ये जातात, असं समजत चित्रपटवाले त्या क्षेत्रातील व्यक्तींना कमी लेखतात.  एवढंच काय, इंटरनेट वरील चित्रपटांसंबंधी माहिती वाचून, स्वस्त झालेल्या कॅमेर्‍यांच्या सहाय्याने एक दोन थातुरमातुर शॉर्ट फिल्म्स बनवून, आपल्या प्रभावळीत त्या चार जणांना दाखवून ’अहो रूपम्‌ अहो ध्वनिम्‌’ या न्यायाने रेकग्निशन मिळवणारी, आणि तेवढ्या भांडवलावर वरील तीनही गटांना ’तद्दन व्यावसायिक’ म्हणून … पुढे वाचा »

बुधवार, २७ मे, २०२०

हैरत से तक रहा था जहॉं-ए-वफा उसे (मास्टर मदन)


  • Yun Naa Rah Rah Ke Hame Tarsaiye Singer: Master Madan (1935) Lyrics: Sagar Nizami. अगदी बालवयातच तत्कालीन अनेक गायकांची रेकॉर्डिंग्स तंतोतंत गाणार्‍या कुमार गंधर्वांचे Child Prodigy म्हणून कौतुक केले जात असे. ते आठ वर्षांचे असताना त्यांनी गायलेल्या ’रामकली’च्या रेकॉर्डने मला बेभान केले होते. खुद्द कुमारांनी प्रा. माधव मोहोळकर यांना दिलेल्या मुलाखतीत असे म्हटले आहे की, 'ती सारी पोपटपंची होती. इतरांची गायकी तंतोतंत गाणे म्हणजे गाणे नव्हे. गायकाची वाट स्वत:ची असायला हवी.' पुढे संगीत क्षेत्रात त्यांनी केलेली बंडखोरी आणि गायकीला दिलेली नवी वाट सर्वश्रुत आहेच. पण कुमारांच्याही आधी आठ वर्षांच्या एका मुलाने ही उपाधी मिळवली होती. त्याने उत्तर भारत… पुढे वाचा »

शनिवार, २३ मे, २०२०

माय लिटल् डम्पलिंग


  • काही दशकांपूर्वी ’२००१ अ स्पेस ओडिसी’ म्हणून चित्रपट येऊन गेला. त्यातील सुरुवातीच्या एका प्रसंगामध्ये मानवी उत्क्रांतीच्या आद्यकाळातील एक चिंपांझी नुकतेच हत्याराप्रमाणे वापरण्यास शिकलेले एक हाड विजयोन्मादाने हवेत उंच भिरकावतो; ते इतके उंच जाते की थेट अंतराळात पोहोचते आणि हळूहळू एका अंतराळयानात परिवर्तित होते. मानवी प्रगतीची झेप दहा सेकंदाहून कमी अवधीत दाखवणारा तो प्रसंग चित्रपट इतिहासातील एक संस्मरणीय मानला जातो, त्याला चित्रपट इतिहासातील ’सर्वात दीर्घ जम्प-कट’ असे म्हटले जाते. २०१८ मध्ये आलेल्या जेमतेम तीन मिनिटांच्या ’बाओ’ या चलच्चित्रपटाने मातृत्वाचा प्रवास असाच मर्यादित अवधीमध्ये बसवून दाखवला आहे. या लघुपटाला भक्कम सांस्कृतिक संदर्भ आहे. तो वगळून तो पाहाणे शक्य नाही. विशेष म्हणजे या लघुपटाला शाब्दिक भाषेची जोड नाही. तो संपूर्ण दृश्… पुढे वाचा »