RamataramMarquee

सूची: अनुक्रमे ▶ वेचे ▶ वेचताना ▶ दृक-श्राव्य ▶
मास्टर मदन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मास्टर मदन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, २७ मे, २०२०

हैरत से तक रहा था जहॉं-ए-वफा उसे (मास्टर मदन)


  • Yun Naa Rah Rah Ke Hame Tarsaiye Singer: Master Madan (1935) Lyrics: Sagar Nizami. अगदी बालवयातच तत्कालीन अनेक गायकांची रेकॉर्डिंग्स तंतोतंत गाणार्‍या कुमार गंधर्वांचे Child Prodigy म्हणून कौतुक केले जात असे. ते आठ वर्षांचे असताना त्यांनी गायलेल्या ’रामकली’च्या रेकॉर्डने मला बेभान केले होते. खुद्द कुमारांनी प्रा. माधव मोहोळकर यांना दिलेल्या मुलाखतीत असे म्हटले आहे की, 'ती सारी पोपटपंची होती. इतरांची गायकी तंतोतंत गाणे म्हणजे गाणे नव्हे. गायकाची वाट स्वत:ची असायला हवी.' पुढे संगीत क्षेत्रात त्यांनी केलेली बंडखोरी आणि गायकीला दिलेली नवी वाट सर्वश्रुत आहेच. पण कुमारांच्याही आधी आठ वर्षांच्या एका मुलाने ही उपाधी मिळवली होती. त्याने उत्तर भारतात तुफान मचवले होते. जेव्हा शब्दही धड उच्चारता येत नव्हते अशा वय वर्षे दोन असल्यापासून गायकीचे धडे गिरवणार्‍या या मुलाने आठव्या वर्षीच मैफलींमधून धुमाकूळ घालायला सुरुवात केली. त्याचवर्षी पहिली रेकॉर्डही दिली. धनत्तर संगीत-रसिक आणि राजे-नवाबांकडून त्या...

    पुढे वाचा »