RamataramMarquee

सोमवार, १२ ऑक्टोबर, २०२०

काळात सांग काळात, काय ते झाले


  • ’द बिग बॅंग थिअरी’ ही अतिशय गाजलेली आणि नुकतीच संपलेली विनोदी मालिका. यातील विज्ञानाचे चार पदवीधर अधून मधून तंत्रज्ञान वा विज्ञान याबाबत काही साधकबाधक, काही उद्बोधक चर्चा करत असतात. अशाच एक चर्चेदरम्यान कालप्रवासाच्या संदर्भात निर्माण झालेला हा भाषिक अथवा व्याकरणविषयक प्रश्न. English grammar in time travel Serial: The Big Bang Theory Episode: The Focus Attenuation (2014). Howard : Something doesn't make sense. Look... In 2015, Biff steals the sports almanac and takes the time machine back to 1955, to give it to his younger self. But as soon as he does that, he changes the future, so the 2015 he returns to would be a "differen… पुढे वाचा »

शनिवार, ३ ऑक्टोबर, २०२०

दाद द्या अन् शुद्ध व्हा


  • ...आणि तो आला. सार्‍या प्रेक्षागृहाच्या नजरा त्याच्याकडे वळल्या. 'अरेच्या, हाच का तो?' असा प्रश्न मनात उमटतो. कारण 'तो' शिडशिडीत, अंगातून वीज सळसळत असावी तसा चपळ, डोक्यावर गोल हॅट, पार्श्वभागापर्यंत लो़ळत गेलेला बटलर कोट, आडमाप ढगळ पँट, डोळ्यात सदाहरित चौकस नि मिश्किल नजर आणि उजव्या हातात या सार्‍यांना आपल्या तालावर नाचवणारी एक ओल्ड मॅन्स स्टिक. हा वृद्ध पण तरीही हातात काठी नाही, अंगाने भरलेला, नेमक्या मापाचे कपडे, बो-टाय... हाच काय तो? त्याला ती क्षणभराची शांतता देखील असह्य होते, आज वयामुळे शारीरिक हालचाली तर मंद झाल्या आहेत. इतक्यात ती मानेची चिरपरिचित हालचाल होते नि गर्दीची खात्री पटते.... अरे हाच की तो. क्षणार्धात सारे सभागृह हर्षातिरेकाने उठून उभे राहते. त्याला नकोशा वाटलेल्या शांततेला मागे सारून टाळ्यांचा कल्लो… पुढे वाचा »