RamataramMarquee

सूची: अनुक्रमे  ▶ वेचे  ▶ वेचताना  ▶ दृक-श्राव्य  ▶
चार्ली चॅप्लिन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
चार्ली चॅप्लिन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, ३ ऑक्टोबर, २०२०

दाद द्या अन् शुद्ध व्हा


  • ...आणि तो आला. सार्‍या प्रेक्षागृहाच्या नजरा त्याच्याकडे वळल्या. 'अरेच्या, हाच का तो?' असा प्रश्न मनात उमटतो. कारण 'तो' शिडशिडीत, अंगातून वीज सळसळत असावी तसा चपळ, डोक्यावर गोल हॅट, पार्श्वभागापर्यंत लो़ळत गेलेला बटलर कोट, आडमाप ढगळ पँट, डोळ्यात सदाहरित चौकस नि मिश्किल नजर आणि उजव्या हातात या सार्‍यांना आपल्या तालावर नाचवणारी एक ओल्ड मॅन्स स्टिक. हा वृद्ध पण तरीही हातात काठी नाही, अंगाने भरलेला, नेमक्या मापाचे कपडे, बो-टाय... हाच काय तो? त्याला ती क्षणभराची शांतता देखील असह्य होते, आज वयामुळे शारीरिक हालचाली तर मंद झाल्या आहेत. इतक्यात ती मानेची चिरपरिचित हालचाल होते नि गर्दीची खात्री पटते.... अरे हाच की तो. क्षणार्धात सारे सभागृह हर्षातिरेकाने उठून उभे राहते. त्याला नकोशा वाटलेल्या शांततेला मागे सारून टाळ्यांचा कल्लोळ उसळलाय. सारं सभागृह उत्स्फूर्तपणे उभे राहिले आहे. अधेमध्ये 'ब्रावो ब्रावो'चा उद्घोषही ऐकू येतोय. सावकाश पावले टाकीत तो पोडियम जवळ येतो तरी तो टाळ्यांचा गजर कमी होत नाही... त्याला आता बोलायचंय्... पण तरीही लोकांचा उन्मेष निवळलेला नाही... ...

    पुढे वाचा »