-
जगप्रसिद्ध चित्रकार पाब्लो पिकासो ह्यालाही असा शिकारखाना पाळण्याची हौस होती. त्याच्याकडे पिवळ्या रंजन रंगाचे, कुलूकुलू बोलणारे कनारी पक्षी होते. कबुतरे होती. ‘टुर्टलडव्हज्' जातीची पाखरे होती. आपल्या मित्रांच्या हेतूबद्दल पाब्लोला जसा संशय असे, तसा या मित्रांबद्दल नसे. म्युझियममधल्या कोपऱ्यात सापडलेले एक जखमी घुबड त्याला कोणा मित्राने आणून दिले. ह्या घुबडाचा एक पंजा दुखावलेला होता. काही दिवस मलमपट्टी केल्यावर तो बरा झाला. मग या घुबडासाठी सुरेख पिंजरा आणून इतर पक्ष्यांबरोबर पाब्लोने त्यालाही पाळले. घरातली सगळी माणसे ह्या दिवाभीताशी प्रेमाने वागत. येता-जाता त्याच्या पिंजर्याशी जाऊन बोलत. पण घुबड फार माणूसघाणे होते. ते सर्वांकडे रखारखा बघत असे. सगळे पाळीव पक्षी स्वयंपाकघरात होते. पाब्लो किंवा फ्रान्सवाद (पिकासोची तरुण मैत्रीण) की कोणी स्वयंपाकघरात गेले की, कनारी चिवचिवाट करत, कबुतरे घुमू लागत, टुर्टलडव्हज् हसू लागत; पण हे घुबड मात्र ढम्म बसून असे. कधी त्याचा आवाज उमटलाच, तर गुरगुरणे असे. ह्या माणूसघाण्या घुबडाच्या अंगाला फार घाण येई. ...
पुढे वाचा »
RamataramMarquee
‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - १३ : गरजा, मागणी आणि पुरवठा ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - १२ : जठराग्नी शमवाया भूतां ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - ११ : अद्यतनीकरण (Update) ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - १० : नव्या व्यवस्थेकडे ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - ९ : सर्वे सुखिन: सन्तु सण गेले विरुनी ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - ८ : धर्म आणि सहजीवन प्लरिबस’च्या निमित्ताने... - ७ : वैय्यक्तिक संपत्ती नि विषमता
डोहातील सावल्या लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
डोहातील सावल्या लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
सोमवार, १० जुलै, २०२३
पिकासोचे घुबड
Labels:
डोहातील सावल्या,
पुस्तक,
व्यंकटेश माडगूळकर,
स्फुट
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
