-
“ता-त्या” “काय बाबा?” “मला गोष्ट सांगा की!” “कशाची सांगू?” अंधारात माझ्याशेजारी झोपलेल्या पाच वर्षाच्या बाबानं विचार केला. मी म्हणालो, ‘आता आपली परीक्षा आहे. गोष्टी लिहिणं हा जन्माचा उद्योग आहे, पण पोरांना गोष्ट सांगणं हे काम भलतंच कठीण! त्यांना कसली गोष्ट आवडेल ह्याचा अंदाज कधीच येत नाही. सांगून परिणाम पाहावा म्हटलं, तर अपेक्षेपेक्षा वेगळाच परिणाम दिसतो.’ पुष्कळ गोष्टी माहीत नसतात, शब्द ओळखीचे नसतात. पंचतंत्रातल्या काही कथा सांगून पाहिल्या, त्या बाबाला रंजक वाटल्या नाहीत. सिंह जाळ्यात सापडला. जाळ्यात म्हणजे कशात? (आम्ही खेड्यात जन्माला आलो आणि वाढलो, त्यामुळे ही अडचण आली नाही.) गाढवानं वाघाचं कातडं पांघरलं. कसं? त्याला हात कुठं असतात पांघरून घ्यायला? रंगाच्या भांड्यात पडलेला कोल्हा जनावरांना म्हणाला कसा? कोल्ह्याला बोलता कसं येईल? त्या तळ्यात खूप मासे होते. तळं म्हणजे काय? तात्पर्य– पंचतंत्राचा उपयोग नाही. “वासराची सांगता?” “तू वासरू कुठं बघितलंस?” “आहे की जगतापाच्याकडं. गाय आणि तिचं छान लहान वासरू आहे.” ‘बरं, म्हणजे कथानायकाचा परिचय आहे.’ “सांगा वासराची.” प्रसंग ब...
पुढे वाचा »
RamataramMarquee
नेकी कर और गटर में डाल ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - परिशिष्ट : ‘पदार्पण’ : एक कल्पनाविस्तार (उत्तरार्ध) ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - परिशिष्ट : ‘पदार्पण’ : एक कल्पनाविस्तार (पूर्वार्ध) ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - १५ : उपसंहार ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - १४ : अंत:स्फोटाची अपरिहार्यता ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - १३ : गरजा, मागणी आणि पुरवठा ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - १२ : जठराग्नी शमवाया भूतां ‘प्लरिबस’च्या निमित्ताने... - ११ : अद्यतनीकरण (Update)
बाजार लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
बाजार लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
शुक्रवार, ८ डिसेंबर, २०२३
एका गोष्टीची गोष्ट
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
