RamataramMarquee

शुक्रवार, ३१ डिसेंबर, २०२१

वर्षान्त विशेष: सण आले जुळुनि... (उत्तरार्ध)


  • ( हा दीर्घ लेख दोन भागांत प्रसिद्ध होतो आहे. याचा पूर्वार्ध २५ डिसेंबर रोजी प्रसिद्ध झाला आहे . तर हा उत्तरार्ध आज वर्षअखेरीस प्रसिद्ध होतो आहे.) सण आले जुळुनि... (पूर्वार्ध)   << मागील भाग मागील लेखार्धाच्या सुरुवातीलाच आलेल्या ओलाफच्या गाण्यात ’मेले कलिकी’ असा एक उल्लेख आला आहे, त्यामागचा इतिहासही मजेशीर आहे. प्रशांत महासागरातील हवाई बेटे ही अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या अधिपत्याखाली आहेत. तेथील बहुसंख्या ख्रिश्चन आहे. त्यामुळे ख्रिसमससह बहुतेक ख्रिस्ती परंपरेतील सण तिथेही साजरे केले जातात. पण फरक असा आहे, की ही बेटे अमेरिकेच्या मूळ भूमीपासून बरीच दक्षिणेला म्हणजे उष्ण कटिबंधात येतात. त्यामुळे अमेरिकेत डिसेंबरमध्ये सुरू होणारा हिवाळा तिथे आणखी काही आठवड्यांनी सुरु होतो. त्यामुळे ख्रिसमस काळात तिथे चक्क उष्ण हवामान असते. त्… पुढे वाचा »

शनिवार, २५ डिसेंबर, २०२१

वर्षान्त विशेष: सण आले जुळुनि... (पूर्वार्ध)


  • ( हा दीर्घ लेख दोन भागांत प्रसिद्ध करतो आहे. याचा हा पूर्वार्ध आज २५ डिसेंबर रोजी प्रसिद्ध होतो आहे, तर उत्तरार्ध ३१ डिसेंबर रोजी प्रसिद्ध होईल'. या दोन दिवसांचे औचित्य लेखांमध्येच स्पष्ट होईल. ) बॉलिवूड चित्रपटांच्या बहुसंख्य चित्रपटाच्या प्रेमींना चित्रपट म्हटले की ’कुणाचा चित्रपट?’ असा प्रश्न विचारण्याची सवय आहे. कारण चित्रपट हे हीरो अथवा हीरोईन म्हणून निवडलेल्या नट अथवा नटीच्या चाहत्यांच्या अंधप्रेमावरच अधिक चालतात. चित्रपटाचा हीरो शाहरुख खान आहे, संजय दत्त आहे किंवा कतरिना कैफ हीरोईन आहे म्हणून अधिक काही न विचार करता डोळे मिटून तिकिट काढणारे चाहते या चित्रपटसृष्टीचे आधार आहेत. टॉलिवूड म्हणून ओळखल्या जाणार्‍या तमिळ चित्रपटसृष्टीत तर या अभिनेत्यांची देवळे, फॅन-क्लब वगैरेपर्यंत प्रगती(?) झालेली आहे. हॉलिवूडची स्थितीही फार वेगळी… पुढे वाचा »

रविवार, १५ ऑगस्ट, २०२१

स्वातंत्र्यदिनाची वेचणी : देशासाठी चार गीते


  • भक्ती असा शब्द आला की तिच्यासोबत कर्मकांडे आणि अवडंबर ओघाने येतेच. मग ती देवभक्ती असो, राष्ट्रभक्ती असो की व्यक्तिभक्ती. भक्तीला, श्रद्धेला निखळ स्वरूपात न ठेवता त्यावर शेंदराची पुटे चढवून तिची विक्रयवस्तू केल्याखेरीज बहुतेक स्वयंघोषित भक्तांना चैन पडत नाही. एकामागून एक अशा चित्रविचित्र कल्पनांचे आणि पूर्वग्रहांचे कपडे तिच्यावर चढवून तिला पाऽर बुजगावण्याचे स्वरूप दिल्यावरच माणसे कृतकृत्य होत असतात. गद्य शब्दांपेक्षा अनेकदा गीत-संगीताने भावनांचा रसपरिपोष अधिक नेमका आणि निखळ होत असतो. देशभक्तिपर भावनांचे कढ तर सोडा, कढी उतू जात असताना अनलंकृत देशभक्तीला मुजरा करणारी ही चार गाणी. यांची निवडही अगदी छातीबडवू स्वयंघोषित देशभक्तांपासून त्या भावनेशी प्रामाणिक असणार्‍यांपर्यंत सार्‍यांनाच भावतील अशी केली आहे. पहिले गीत आहे राष्ट्रसेवादलाचे अध्व… पुढे वाचा »

सोमवार, २६ जुलै, २०२१

द मेड ते पोस्टमेन इन द माऊंटन्स... व्हाया प्रदक्षिणा, राशोमोन, ब्रॉडचर्च


  • प्रथम टोळी, मग नीतिनियमादि चौकटी अधिक काटेकोर होत तिचा बनलेला समाज, पुढे पुनरुत्पादन प्रक्रियेची समज आल्यानंतर रक्ताच्या नात्याने बांधले गेलेले व्यापक कुटुंब, आणि माणूस जसजसा शहरी जीवन अंगीकारता झाला तसे ते संकुचित होत उदयाला आलेली एककेंद्री कुटुंब-व्यवस्था (१) ... या मार्गे माणसाच्या नात्यांच्या जाणीवांचा प्रवास होत गेला आहे. याचा पुढचा टप्पा बनू पाहात असलेले स्वकेंद्रितांचे दुभंग, विखंडित कुटुंब हे ‘फायनल डेस्टीनेशन’ ही अमेरिकेची संयुक्त संस्थानांची उरलेल्या जगाला देणगी असे म्हणण्यास फारशी कुणाची हरकत नसावी. विभक्त आई-वडील, शक्य तितक्या लवकर सुटी/स्वतंत्र होऊ पाहणारी मुले, त्यातून भावनिक बंधांना येणारा कमकुवतपणा, कोरडेपणाही अपरिहार्यपणे येतोच. मग त्याची भरपाई करण्यासाठी अगदी पौगंडावस्थेपासून जोडीदाराचा शोध; नात्यांच्या वैविध्याच्या अभ… पुढे वाचा »

बुधवार, १४ जुलै, २०२१

चार प्रार्थना


  • प्रार्थना हा गीतप्रकार असा आहे की ज्यात श्रद्धेपेक्षा भावनेला अधिक आवाहन असते. शिव-विष्णूची केली, अल्लाहची केली की येशूची हा मुद्दा गौण होऊन गीतातील भाव जेव्हा ऐकणार्‍यापर्यंत पोचवते ती कविता म्हणजे प्रार्थना. एखाद्या नास्तिकालाही मंत्रमुग्ध करु शकते, तो ही जिच्याशी तद्रूप होऊ शकते ती प्रार्थना. शेवटी श्रद्धास्थान ही माणसाच्या कल्पनेचीच निर्मिती असल्याने, त्याच्या प्रार्थनेची परिणामकारकताही त्याच्या मनाच्या, शब्दांच्या आणि भावनेच्या प्रामाणिकपणावर अवलंबून असते. मी स्वत:ला हिंदू, मुस्लिम, ख्रिस्ती अशा धार्मिक अथवा सश्रद्ध, अश्रद्ध, अज्ञेयवादी अशा कृत्रिम आणि तरीही धूसर सीमारेषांच्या वर्गीकरणांच्या चौकटीत तपासून पाहात नाही. आवड, नावड आणि निवड यांच्याशी प्रामाणिक राहात जे पटेल आवडेल त्याचा स्वीकार आणि जे रुचणार नाही, पटणार नाही त्याचा अस्वी… पुढे वाचा »

रविवार, २० जून, २०२१

अमरत्वाची आस नि चिरंजीवित्वाचा फास


  • ’क्लॅश ऑफ टायटन्स’ (१) या चित्रपटातील हा एक प्रसंग आहे. पर्सिअस (२) हा झ्यूस या ऑलिम्पिअन देवांच्या पहिल्या पिढीतील देवाचा पुत्र आहे. पण तो जन्मापासून वडिलांपासून दूर वाढल्यामुळे त्याला ते ठाऊक नाही. आयो त्याला त्याचे जन्मरहस्य सांगते आहे. पण तो तिलाही ओळखत नसल्याने तिच्याबद्दल विचारणा करतो, तेव्हा ती आपण कोण त्याचा उलगडा करते आहे. ही डेमिगॉड म्हणजे निम्नदेवता किंवा साहाय्यक देवता आहे, साधारणत: आपल्याकडील यक्ष व अप्सरांसारखी. हे देवांप्रमाणेच चिरंजीव आहेत, पण त्यांना देवत्व मिळालेले नाही. देवांचे साहाय्यक अशीच त्यांची कायम भूमिका आहे. आपली पार्श्वभूमी सांगताना ती ’चिरंजीवित्वाचा शाप’ असा उल्लेख करते. सर्वस्वी मानवी आयुष्य जगलेल्या (आणि म्हणून त्या जमातीमधील चिरंजीवित्वाची, दीर्घायुष्याची आस वारशाने मिळालेल्या) पर्सिअसला तो उल्लेख आश… पुढे वाचा »