RamataramMarquee

Indexes Menu_Desktop

संपूर्ण सूची :

रविवार, ३० जानेवारी, २०२२

वेचताना... : तुझे आहे तुजपाशी


  • मला कुणाचीच भूमिका घ्यायची नाही. मला माझीच भूमिका घ्यायला हवी. भूतकालभोगी जनतेमध्ये बहुसंख्य मंडळी भूमिकाच काय पण जगण्याची चौकटही भूतकालातून, इतरांकडून स्वीकारत असतात. आणि तीच आपल्यासाठी योग्य आहे हे स्वत:ला नि इतरांना पटवण्यामध्ये आपले आयुष्य व्यतीत करत असतात. आपली भूमिका, जगण्याची चौकट ही स्वत:ची निर्मिती नसली, तरी निदान आपली निवड असावी इतपत स्वातंत्र्य घेण्याचीही त्यांची तयारी नसते. त्यामुळे वारशाच्या कुबड्यांनाच ते आपला आधार करून जगत राहतात . कारण 'लादलेल्या भूमिकेहून वेगळी भूमिका घेण्याचे स्वातंत्र्य आपल्याला नाही' असा बहुतेकांचा समज असतो. आणि 'ते आहे' याचे भान असलेल्या इतरांतील बहुसंख्या स्वातंत्र्य या संकल्पनेलाच घाबरून असते. आणि म्हणून ते सारे सामाजिक, कौटुंबिक वारशाचे जोखड फुलांचा हार असल्याचे मानून मिरवत असतात… पुढे वाचा »

गुरुवार, २७ जानेवारी, २०२२

स्थितप्रज्ञस्य का भाषा


  • श्याम: वासूअण्णा... वासूअण्णा- वासू: (समोर येऊन उभा राहतो. बोलत नाही.) श्याम: अरे राम राम राम. हे सूत काढायचं काम इतकं अवघड असेल असं वाटलं नव्हतं मला. ह्या गीतानं मला सूत काढायला दोन दिवसांत शिकवते म्हणून वचन दिलं आणि स्वतः कुठं गायब झाली कुणास ठाऊक ! गीता आचार्याच्या बरोबर बद्रिनारायण शेठजींच्या घरी गेली का वासूअण्णा? वासू: (मानेने नाही म्हणतो.) श्याम: नाही गेली ? मग कुठे गेली ? वासू: (खुणेने 'कोण जाणे' असा भाव व्यक्त करतो.) श्याम: मग नीट सांग ना-हे असं (त्याने केलेल्या खुणेसारखे करीत) काय ? बोलायला काय झालं? अहो, गीता काय करतेय् ? वासू: (खुणेने वाचते आहे असे दाखवतो.) श्याम: वाचते आहे ? मग बोलत का नाही ? वासू: लावलंत बोलायला ? आचार्यांनी मला आजचा दिवस मौन पाळ… पुढे वाचा »

मंगळवार, २५ जानेवारी, २०२२

लोकशाहीच्या नावानं चांगभलं


  • One heart-bit away from Presidency and not a single vote is cast in my name. Democracy is so over-rated.      - Frank Underwood ( House of Cards : Season 2, Episode 2) लोकशाही म्हणजे ’लोकांचे, लोकांसाठी, लोकांनी चालवलेले राज्य’ (Democracy is government of the people, by the people, and for the people) ही अब्राहम लिंकनने केलेली व्याख्या आपण नागरिकशास्त्राच्या परीक्षेसाठी पाठ केलेली असते. जिथे अभ्यासक्रमात नागरिकशास्त्र हा विषय इतिहासाला जोडलेला असतो, त्या देशात नागरिकशास्त्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन किती उदासीनतेचा असतो हे ध्यानात यावे. वास्तविक एखाद्या राज्याला, व्यवस्थेला इतिहासापेक्षा वर्तमानाचे नियोजन, प्रशासन नि संचालन यांची घडी बसवण्यास अत्यावश्यक असलेल्या नागरिकशास्त्राचे महत्त्व अधिक असायला हवे. पण भूतकालभोग… पुढे वाचा »