RamataramMarquee

Indexes Menu_Desktop

संपूर्ण सूची :

शुक्रवार, १८ जुलै, २०२५

सोन्याची लंका, रामराज्य आणि समाज


  • रावणाने डोळ्यांवर हात ठेवत सूर्याकडे नजर केली. आणि तो हसला. ‘काय झालं हसायला?’ कुंभकर्णाने विचारलं.. रावण आणि कुंभकर्ण सीतेच्या कुटीबाहेरच्या पडवीत उभे होते. तिची वाट बघत. त्यांनी नुकतीच न्याहारी केली होती. न्याहारी करून झाल्यावर पूजेसाठी सीता पुन्हा आता कुटीत गेली होती.. ‘असंच... दुःखात बुडालेला सूर्य पाहतोय,’ रावण उत्तरला. कुंभकर्ण खट्याळ हसत म्हणाला. ‘मला कळत नाही दादा, की कुठला तू जास्त त्रासदायक आहेस माझ्यासाठी. पूर्वीचा तू, जो माझं कधीच ऐकायचा नाही की आताच हा नवीन तत्त्वज्ञानी तू, जो कोड्यात बोलतो !’. रावण कुंभकर्णाच्या पोटात एक गुद्दा देत म्हणाला.‘अरे हलकट कुत्र्या!’ कुंभकर्ण रावणाला घट्ट मिठी मारत आणखी मोठ्याने हसू लागला. डोळ्यांतून पाणी येईपर्यंत एकमेकांना घट्ट मिठी मारत ते दोघे हसत राहिले. आणि मग त्यांच्या डोळ्यां… पुढे वाचा »