-
भल्या सकाळीच सारा गाव कलकलत उठला. लष्कराचा रिसाला तोफा-बंदुका घेऊन येत होता. रिसाला जसजसा जवळ येऊ लागला, तसतसा सारा जनाना रसोड्यात जाऊन पडदाशीन झाला नि सगळा मर्दाना हात उपरण्यानं बांधून रिसाल्याच्या स्वागताला उभा राहिला. दहेजमध्ये मिळालेल्या ढाली, तलवारी किंवा ठासणीच्या बंदुका घेऊन लष्कराच्या रिसाल्याशी मुकाबला करणं शक्यच नव्हतं. तेव्हा मागतील तितक्या कोंबड्या, बकऱ्या, शाली, गोधड्या देऊन नाक घासायचं, यापरता पर्याय नव्हता. गुलबेगनं रांजण रिकामा केला... चकचकीत चांदीच्या सहा हजार कोरी रुमालात बांधून घेतल्या... लष्कराचा जो कुणी मनसबदार असेल, त्याला नजराणा करायला ! रिसाला बगाडीयो गावात शिरला. गुलबेग लोटांगण घालायला पुढं सरसावला. गावाचा मुखिया होता तो. गावकऱ्यांची जान-अब्रू वाचवायची त्याची जबाबदारी होती. पण... त्याला लोटांगण घालावेच लागले नाही… पुढे वाचा »
RamataramMarquee
आली माझ्या घरी ही...       me me me me meme, इलेक्शन वाले meme       आळशांच्या बहुमता...       निवडणुका, प्रातिनिधित्व: अमेरिका आणि भारत       ट्रम्प, अमेरिका आणि जागतिक बदलाचे वारे - २ : ट्रम्प आणि इस्रायल       ट्रम्प, अमेरिका आणि जागतिक बदलाचे वारे - १       अर्ध्यावरती डाव मोडला...       वारसा, जिज्ञासा आणि ज्ञान - २ : पण याचा उपयोग काय?      
Indexes Menu_Desktop
| संपूर्ण सूची : |
सोमवार, २२ डिसेंबर, २०२५
स्वतंत्रते...
Labels:
अनिल बर्वे,
कथा,
पुस्तक,
युद्धविराम आणि होरपळ
सोमवार, १५ डिसेंबर, २०२५
प्रेषित आणि क्रांतिदूत
-
त्याचं खाणं संपायच्या आधीच रघू दार लोटून आत आला. रघू अठ्ठावीस वर्षांचा, श्रीमंत बापाचा वाया गेलेला मुलगा. वाया गेलेला म्हणजे जगाच्या दृष्टीने. गेली तीन वर्ष रघूनं दाढी केलेली नव्हती. भारतात आमूलाग्र क्रांती कशा पद्धतीने घडवून आणता येईल याचा तो सतत विचार करी. तेच त्याचं वेड. त्यासाठी तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत एशियाटिक सोसायटीच्या ग्रंथालयात अभ्यास करीत बसलेला असे. कास्टाला आपल्या क्रांतीचा अग्रदूत बनविणे हेही त्याचं एक ईप्सित होतं. गळ्यातली बॅग कास्टाच्या टेबलावर ठेवीत रघू म्हणाला, “घाईत असल्याचं ऐकलं.” “हा निघालोच, साडेअकराला केस आहे लेबर कमिशनरपुढे.” “मर असाच! तू असाच केसेस लढवीत मरणार. भरघोस काम तुझ्या हातून काही होणार नाही.” कास्टा नुसताच हसला. बाजूचा कागद उचलून त्यानं हात पुसलेल… पुढे वाचा »
बुधवार, ३ डिसेंबर, २०२५
यमुनातीरीचे बुलबुल
-
खूपच लहान होते तेव्हा टाळ्या वाजवत म्हटलेलं एक तसं निरर्थकच गाणं अजून आठवतं. कदाचित् अंक शिकवण्यासाठी ते गाणं रचलेलं असेल. यमुनेच्या तीरी किती बुलबुल असतील? बुलबुल असतील, बुलबुल असतील हो? आणि मग या प्रश्नाला उत्तर म्हणून म्हणायचं, एक तरी, दोन तरी, तीन तरी असतील. चार तरी असतील, चार तरी असतील हो! गाणं म्हणता म्हणता पाच, सहा, सात, आठ अशी बुलबुलांची संख्या वाढवत न्यायची. मी तेव्हा बुलबुल मुळी पाह्यलाच नव्हता. तो केवढा, कुठल्या रंगाचा असतो, त्याचा आवाज कसा असतो हे मुळीसुद्धा माहीत नव्हतं. आणि यमुनेची तरी कुठे काही माहिती होती! आणि माहिती करून घेण्याची जरुरी पण तेव्हा, त्या गाण्यापुरती तरी वाटली नाही. उलट नेहमी, अगदी नेहमी, मनात एक नदी वळण घेत वहात यायची. पाण्यानं खूप भरलेली नदी. काठांवर खूप दाट गवत. किंचित् पुढे गर्द झाडांची झि… पुढे वाचा »
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)


