-
हा व्हिडिओ बराच जुना आहे. Still priceless. Father gets a gift of his lifetime (१) . काही काळापूर्वी डेव्हिड अटेनबरो आजोबांचे निवेदन असलेली एक सुंदर डॉक्युमेंटरी पाहिली होती. जगाबद्दलच्या आपल्या आकलनामध्ये रंगज्ञानाचा वाटा किती मोठा आहे हे हळूहळू ध्यानात येत गेले. माणूस हा जगात सर्वाधिक लाडावलेला प्राणी आहे, त्याला इतर कोणत्याही प्राण्यापेक्षा– सजीवापेक्षा म्हणू, अधिक बौद्धिक, शारीरिक कुवतीचा वारसा मिळालेला आहे... असं त्याला स्वत:ला वाटतं! पण त्या मुद्द्याकडे मी जात नाही. माणसाने रंगपटाचे तीन प्रमुख वा मूलभूत रंग मानलेले आहेत. चित्रकलेच्या तासाला आम्हाला लाल, निळा नि पिवळा असे सांगितले जायचे, आता संगणकाच्या जमान्यात पिवळ्याऐवजी तिथे… पुढे वाचा »
RamataramMarquee
अर्ध्यावरती डाव मोडला...       वारसा, जिज्ञासा आणि ज्ञान - २ : पण याचा उपयोग काय?       पौरुषाचा कांगावा      वारसा, जिज्ञासा आणि ज्ञान - १. वृद्धत्वाची जेथ प्रचिती...       काव्य-मोतीचूर ऊर्फ काही ‘चविष्ट’ प्रेमकविता       चला दोस्तहो, खाण्यावरती बोलू काही       मूषकान्योक्ती       सुजन गवसला जो      
Indexes Menu_Desktop
| संपूर्ण सूची : |
शनिवार, ३० ऑगस्ट, २०२५
रंगांचा उघडुनिया पंखा
रविवार, १० ऑगस्ट, २०२५
वेचताना... : बनगरवाडी
-
प्रास्ताविक : ‘वेचित चाललो...’ वर माझा प्रघात असा आहे की एखादा वेचा इथे घेतला, की त्यावरचे वा तो ज्यातून घेतल्या त्या पुस्तकावरचे माझे भाष्य, आकलन हे ‘वेचताना’ शीर्षकाखाली समाविष्ट करतो. इथे बनगरवाडीबाबत अपवाद करतो आहे. त्या कादंबरीच्या आकलनाबाबत नव्हे तर एक पुस्तक म्हणून झालेल्या प्रवासाबाबत खुद्द माडगूळकरांनीच ‘प्रवास: एका लेखकाचा’ मध्ये तपशीलवारपणे लिहिले आहे. कादंबरीचा जन्म, तिचे भाषेच्या नि भौगोलिक सीमा ओलांडून जाणे, त्याभोवतीचे अर्थकारण नि व्यवहार आदी सारी अनुषंगे एकत्रितपणे त्यामध्ये समाविष्ट आहेत. ‘वेचताना’ सदरामध्ये तेच प्रकाशित करतो आहे. हा निवडण्याचे आणखी एक औचित्य म्हणजे ‘वेचित...’साठी मी बनगरवाडीमधून निवडलेला शेकू नि त्याच्या पत्नीशी संबंधित वेचा हा विविध देशांतून अनुवादित स्वरूपात वापरला गेला असल्याचा उल्लेख त्यामध्ये … पुढे वाचा »
Labels:
अनुभव,
पुस्तक,
प्रवास: एका लेखकाचा,
बनगरवाडी,
वेचताना,
व्यंकटेश माडगूळकर
बुधवार, ६ ऑगस्ट, २०२५
बाईल
-
एका ठरावीक वेळेला शाळा भरवणे, सोडणे, हे बनगरवाडीच्या शाळेबाबत नेहमीच जमत नसे. साऱ्या जगाला उन्हाळ्यात सुटी तर इथे सुगीला सुटी. मन मानेल तेव्हा शाळा. मोटारसर्व्हिस जशी जागा भरल्यावर सुटते तसे मास्तराने शाळा भरल्यावर शिकवावे. त्यामुळे मास्तराचे क्षेत्र शाळेपुरते मर्यादित राहू शकत नव्हते. कुणी पत्र लिहायला सांगत, कुणी अर्ज लिहायला सांगत. घरी जाण्यासाठी मी जेव्हा रविवारच्या सुटीत निघत असे, तेव्हा माझ्या कोटाचे खिसे पोस्टात टाकण्यासाठी दिलेल्या पत्रांनी भरलेले असत. ही कामे जेव्हा बिनतक्रार मी करू लागलो, तेव्हा कोणी काहीही विचारायला यावे असे झाले. नवराबायकोच्या भांडणापासून तो मेंढरांच्या चोरीपर्यंत सर्व तक्रारी मास्तराकडे येत. मास्तर शिकलेला, शहाणा माणूस. त्याला कायदा कळत असला पाहिजे, बरे-वाईट कोणते हे कळण्याची बुद्धी त्याच्यापाशी असली पाहिजे !… पुढे वाचा »
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)

