RamataramMarquee

सोमवार, १९ डिसेंबर, २०१६

वेचताना... : शाश्वताचे रंग


  • सर्वसामान्य व्यक्ती एखादे पुस्तक वाचल्यानंतर ते 'आवडले किंवा आवडले नाही किंवा ठीक आहे' अशा तीन सर्वसाधारण श्रेणींमधे प्रतिक्रिया देते. फार थोडे जण त्याबाबत अधिक नेमकेपणाने बोलू शकतात. पुस्तकाबद्दल बोलणे-लिहिणे ही सर्वसाधारणपणे 'समीक्षा' या भारदस्त नावाखाली होते आणि त्याचे लेखकही तसेच भारदस्त साहित्यिक व्यक्तिमत्व असावे लागते. आणि ते लेखनही बहुधा भारदस्त शब्दांची पखरण करत, अप्रचलित अशा परदेशी तज्ज्ञांच्या हवाल्याने लिहावे लागते, असा काहीसा समज दिसतो.  पण या दोन टोकांच्या मधे काहीच नसते का? 'पुस्तक मला जसे दिसले तसे' म्हणजे सर्वस्वी सापेक्ष अशा मूल्यमापनाची परवानगी नाही का? असेल तर असे कुणी लिहिते का आणि लिहीत असेल तर ही मधली स्पेस कशा तर्‍हेने भरली जाते?' असे प्रश्न मला पडले होते. … पुढे वाचा »

रविवार, १८ डिसेंबर, २०१६

दिशांताकडून


  • रॉस्कॉलनिकोफ! तुला प्रिय म्हणता येत नाही. प्रिय कुणाला म्हणायचं? जिथं एखादं नातं आहे, जवळचा धागा आहे तिथं. असा धागा तुझ्यामाझ्यात कुठं आहे? त्यामुळे तुझ्याशी काय बोलावं हे कधी नीट कळलं नाही. इतकंच काय, पण असं बोलण्यापूर्वी सुरुवात कोणत्या शब्दात करावी हेसुद्धा बरोबर सुचत नाही. एके काळी- विशेषतः तरुण वयात - तर तुझ्याशी अशा जिव्हाळ्यानं बोलणं अशक्य होतं! तुझी कहाणी वाचली ते दोन दिवस अन् दोन रात्री मला अजूनही स्पष्ट आठवतात. छाती सारखी धडधडत होती! वाचताना एका जागी बसवत नव्हतं. हिंदू कॉलनीतल्या माझ्या खोलीत ताठ बसून, अंग आवळून, भिंतीला कसाबसा रेलून, येरझार्‍या घालून मी वाचत होतो. वाचताना एकदासुद्धा आडवा झालो नाही! जेवणखाण अन् चहापाणी करत होतो, पण त्यात कमालीचं नि:संगपण होतं. आपलं डोकं गरगरत… पुढे वाचा »

शुक्रवार, १६ डिसेंबर, २०१६

वेचताना... : कबीरा खडा बाजारमें


  • फेसबुकसारख्या सोशल मीडियावर असेल किंवा एकुणच माणसांच्या समाजात, एक नियम दिसतो की माणसाची ओळख ही प्रामुख्याने त्याच्या समाजाच्या संदर्भातच असते. एखाद्या नवीन व्यक्तीचा परिचय झाला की आडनाव विचारल्याखेरीज नि त्यावरून 'ती कोणत्या समाजाची असेल' याची मनातल्या मनात नोंद केल्या खेरीज बहुतेकांना परस्परांच्या मैत्रीच्या, नात्याच्या वाटेवर पुढचे पाऊल टाकणे अवघड होते.  एकदा एका गटाच्या खोक्यात तिला बसवले की मग तिळा उघड म्हणताच धाडकन शिळा दूर सरून भारंभार खजिना दिसावा तसे त्यांना होते. अधिक काही न विचारता त्या व्यक्तीबाबत बरेच काही आपल्याला समजल्याची भावना त्यांच्या मनात निर्माण होते. कारण ज्या गटात त्याला बसवले त्या गटाचे - गृहित! - गुणदोष त्याच्यातही आहेत असे मानले तरी बहुसंख्येला - परस्परविरोधी… पुढे वाचा »

आयडेंटिटी


  • कणाद थांबला. त्याने दादांकडे पाहिलं. सुमीकडे पाहिलं. तो जरासा शंकित झाला. आपण जे काही बोलतोय, ते यांना समजतंय का? त्याच्या अनुभवाचा अर्थ लावायचा ते प्रयत्न करताहेत का? काही क्षण द्विधा मनस्थितीत गप्पच राहिला. मग म्हणाला "माणूस जीवनात तसा एकटाच असतो नेहमी. आणि हा एकटेपणा सुसह्य नसतो. त्यावर सतत मात करण्याचा प्रयत्न असतो व्यक्तीचा. पण कित्येक वेळा या एकटेपणाच्या भावनेतून सुटायला तुम्हाला स्वत्वावर मर्यादा घालाव्या लागतात. स्वत्व नाकारावं लागतं. दादा, तुम्ही एकटे पडले आहात. तुम्ही रूढीवादी विचारांचे, आचाराचे नाहीत, म्हणून तुम्ही तुमच्या जातीपासून दुरावला आहात. तुम्ही उच्च जातीशी जमवण्याचा प्रयत्न केला. परंतु ते तुम्हाला जवळ करतात दुय्यम जातीचे म्हणून, आणि सोयीचे असेल तेव्हाच. बाहेरच्या समाजात… पुढे वाचा »

मंगळवार, ६ डिसेंबर, २०१६

वेचताना... : सारे प्रवासी घडीचे


  • आर.के. नारायण यांनी लिहिलेले 'मालगुडी डेज्' हे पुस्तक प्रचंड गाजले. 'दूरदर्शन'ने त्यावर त्याच नावाची एक मालिकाही केली. त्या मालिकेसाठी नारायण यांचे बंधू प्रसिद्ध व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांनी काढलेल्या रेखाचित्रांमुळे ती मालिका आणि ते पुस्तक यांच्या लोकप्रियतेत भरच पडली. मालगुडी या एकाच गावातील विविध व्यक्ती, घटना, परिसर, बदलत्या जगाच्या तिथे उमटणार्‍या पाऊलखुणा, त्यातून तिथे बदलत जाणारे विश्व, अगदी लहान मुलापासून ते इंग्रजी साहेबाकडे कारकुनी करणार्‍या नव-बूर्ज्वा समाजाचे वेधक चित्रण त्या पुस्तकाने केले. मराठीतूनही असाच प्रयोग झाला, पुस्तक म्हणून तो बर्‍याच अंशी यशस्वी झाला. परंतु मालगुडी डेज् प्रमाणे माध्यमांतराचा कळसाध्याय मात्र त्याला लाभला नाही. जयवंत दळवी यांनी लिहिल… पुढे वाचा »