RamataramMarquee

बुधवार, २९ मार्च, २०१७

वेचताना... : तुघलक


  • 'महंमद बिन तुघलक' हे नाव ऐकले की मूठभर भारतीय वगळले तर बहुतेकांच्या चेहर्‍यावर एक कुत्सित हास्य उमटेल. (या अपवादांची बांधिलकीही वैचारिक असण्यापेक्षा धार्मिक असण्याची शक्यताच अधिक आहे.) 'तुघलकी निर्णय' असा वाक्प्रचार वापरला जातो तो प्रामुख्याने माथेफिरूपणे, सारासार किंवा साधकबाधक विचार न करता, संभाव्य परिणामांचा अंदाज न घेतलेल्या निर्णयाबद्दल. आणि याला संदर्भ असतो तो तुघलकाने आपल्या सुलतानी कारकीर्दीत घेतलेल्या दोन निर्णयांचा. पहिला म्हणजे आपल्या राज्याची राजधानी ही दिल्लीहून देवगिरी (त्याचे दौलताबाद असे नामकरण करून) येथे आणणे आणि चामड्याची नाणी सुरू करण्याचा दुसरा! दोनही निर्णय साफ फसले हे त्याच्या आयुष्यातच त्याच्या ध्यानी आले आणि त्याने सरळ ते मान्य करून त्या दोनही चुका, भरप… पुढे वाचा »

मंगळवार, २८ मार्च, २०१७

फासा आणि फास


  • [ मोठ्या मशीदीपुढचे पटांगण. तुघलक, शेख इमामुद्दिन आणि राजवाड्यावरचे काही चाकर. बाकी कोणीही नाही, प्रथम एक दीर्घ स्तब्धता ] तुघलक : (मध्येच) ओफ्! अब मुझसे यह सह नही जा सकता! इमामुद्दिन : लेकिन क्यौं, हुजूरे आलम? उलट, कुणी आलं नाही याची आपल्याला खुशी झाली पाहिजे. तुघलक : शेखसाहेब, आमच्या प्रजेनं आपल्या भाषणाचा लाभ घेऊ नये अशी आमची मर्जी असती तर ही सभा ठरवण्याचा खटाटोप तरी आम्ही कशासाठी केला असता? आमच्या प्रजेनं मुकी मेंढरं राहावं हे आम्हाला नामंजूर आहे. इतकंच नव्हे तर आम्हीदेखील स्वतःला सर्वज्ञ समजत नाही. आपण आमच्यासंबंधात आज बोलणार आहा ते ऐकण्यासाठी आम्ही केव्हापासून उत्सुक आहो. इमामुद्दिन : माझं भाषण ऐकताना हुजुरांची उत्सुकता राहील असं वाटत नाही. आपण जाणताच की आपण हजर आहा म्हणून आपल्या म… पुढे वाचा »

सोमवार, २० मार्च, २०१७

वेचताना... : एम.टी. आयवा मारू


  • 'एम.टी. आयवा मारू' हे नाव वाचलं तेव्हा पहिली प्रतिक्रिया बुचकळ्यात पडण्याची झाली. मराठी कादंबरीचे हे कसले नाव, कुठली भाषा ही? एम आणि टी ही तर इंग्रजी मुळाक्षरे असावीत असा तर्क करता येत होता, पण पुढचे दोन शब्द बिलकुल लागेनात. त्यामुळे नावावरून हे आपले काम नाही असे गृहित धरून त्या कादंबरीच्या नादी लागू नये असे ठरवले. कारण तो काळ होता तो 'मृत्युंजय', 'छावा', 'श्रीमान योगी' वगैरे कादंबर्‍या भरात असण्याचा. आवृत्यागून आवृत्या निघणार्‍या या कादंबर्‍या नुसत्या वाचल्याच पाहिजेत असे नव्हे, तर त्यांच्या हार्ड-बाउंड प्रती आपल्या टिचभर दिवाणखान्यातल्या शोकेस मधे ठेवणे ही फॅशन असण्याचा काळ होता. महाभारत आणि रामायण या दोन महाकाव्यातील एकेका व्यक्तीला वेठीला धरून 'मृत्युंजय&… पुढे वाचा »

समुद्रपक्षी


  • 'भाभीजी कॉफी घेणार?' 'जरूर अनंत! लेकीन एक शर्त आहे.' 'व्वा! आमची कॉफी प्यायला आम्हालाच शर्त?' 'हां!' 'चालेल, बोला.' 'मला भाभीजी नको म्हणूस.' 'काय म्हणू मग? दीदी?' 'नाही. उज्ज्वला! उज्ज्वलाच म्हण!' 'त्यापेक्षा भाभीजीच बरं वाटतं. सोपं वाटतं.' 'मग उज्जू म्हण.' 'तो हक्क माझा नाही भाभीजी.' 'मग मला नको तुझी कॉफी. थँक्स!' ती पाठ वळवत म्हणाली. 'प्लीज भाभीजी!' 'उज्ज्वला!' 'ओ के भाभीजी... उज्ज्वला!' 'थँक्स अनंत. आता दे कॉफी.' मी मेसचा फोन फिरवला. स्टुअर्ड शास्त्रो अजून तिथेच होता. त्याला कॉफी आणायला सांगून आम्ही विंगमधे आलो. वारा छातीवर घेत उभे राहिलो. माझ्या बाजूला ती उभी हो… पुढे वाचा »

बुधवार, १५ मार्च, २०१७

वेचताना... : रारंग ढांग


  • कोणतीही व्यवस्था असो - मग ती राष्ट्र असो, धर्म असो की जात - तिच्या संदर्भात बाबत चिकित्सेला, बदलांच्या आग्रहाला नि मुख्य म्हणजे टीकेला वाव फार कमी असतो. त्यातही तिच्या संदर्भातील जी संरक्षण व्यवस्था असते ती तर जन्मतःच पवित्र असते, परिपूर्ण असते. तिच्यात अंतर्भूत असलेल्या न्यूनांबद्दल, तिने केलेल्या अन्यायाबद्दल तोंड उघडायला परवानगी नसते. कारण मुळात तिच्यात असं काही असू शकतं हेच बहुसंख्येला मान्य नसतं. एरवी अनेक विषयांबाबत एकमेकांच्या जिवावर उठणारे दोघे या मुद्द्यावर मात्र ठामपणे एकत्र येतात. त्यांच्यावर टीका करणारा बहुधा अन्य व्यवस्थेचा समर्थक किंवा तिचा भाग असतो म्हणून तो टीका करू धजतो, कारण त्याच्यापुरता त्याच्या पाठीशी एका गटाचे बळ उभे असते.  व्यक्तिगत पातळीवर पाहिले तर त्यांचे वस्तुनिष्ठ वि… पुढे वाचा »

सत्ता


  • रात्र काळोखी होती. चांदण्याही चमकत नव्हत्या. आकाशात ढग आले असावेत. हवेत गारवा होता. विश्वनाथनं विंडप्रूफ जॅकेटची बटनं लावली. रस्ता पायाखालचा होता. अधूनमधून टॉर्च लावला की प्रकाश विझल्यावर काही क्षण दिसेनासं होई. स्वतःच्याच विचारात विश्वनाथ चालला होता. गार वारा आला तसं जॅकेटची कॉलर वर करण्यासाठी विश्वनाथ थबकला. त्याच्या लक्षात आलं की, काही दिवसांपूर्वी गुरख्यांच्या भांडणाचे आवाज ऐकून येथूनच तो त्यांच्या विवराकडे गेला होता. आता ते काय करत असतील? विश्वनाथच्या मनात आलं की, आवाज न करता जाऊन काय चाललं आहे हे पाहून यावं. विवराच्या तोंडाशी गार वार्‍यापासून आडोसा मिळवण्यासाठी गुरख्यांनी पत्र्याचे तुकडे, लाकडी खोकी आणि फाटकी पोती लावली होती. त्यातून विश्वनाथनं आत डोकावलं. मिट्टं काळोख होता. कोपर्… पुढे वाचा »